हिंगणघाट मधील भ्रष्टाचार सम्राटांचा बसपा द्वारा निषेध

अन्य सोशल

हिंगणघाट ते वर्धा रोड मधील खड्यात बेशरमाचे झाड लाऊन निषेध

तालुका प्रतिनिधी:सुनिल हिंगे अल्लिपुर

वर्धा ते हिंगणघाट या मुख्य रोडचे बांधकाम तीन वर्षा पूर्वी पुर्ण झाले. रस्त्याचे बांधकाम सिमेंटीकरना द्वारे ठेकेदारास अतिउच्च दर देऊन सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत करण्यात आले. पण हा रस्ता अतिशय नित्कृष्ट दर्जाचा बनविण्यात आला आहे. रस्त्याच्या मधोमध हजारो मोठ्या भेगा पडल्या आहेत व अनेक ठिकाणी रस्ता फुटलेला आहे. सिमेंट रस्त्यातील अश्या भेगा मुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. हिंगणघाट ते वर्धा रोड बांधकामात अतिशय भ्रष्टाचार झालेला आहे त्यामुळे अतिशय नित्कृष्ट दर्जाचे बांधकाम झाले. बहुजन समाज पार्टी हिंगणघाट विधानसभा द्वारा रोड वरील खड्या मध्ये बेशरमचे झाड लाऊन भष्टाचार करणाऱ्या अधिकारी व भ्रष्टाचारसम्राट आमदार व खासदारांचा निषेध करण्यात आला. तसेच भ्रष्टाचार सम्राटा विरुद्ध चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे. सदर आंदोलनामध्ये बहुजन समाज पार्टी वर्धा जिल्हा अध्यक्ष मा. डॉ. मोहनजी राईकवार सर, जिल्हा प्रभारी नितेश कांबळे, जिल्हा प्रभारी दीपक भगत जिल्हा उपाध्यक्ष विलास टेंबरे, जिल्हा महासचिव अनोमदर्शी भैसारे, जिल्हा कोषाध्यक्ष सुनील भगत , अरुणजी डांगे, अशोक मुन, रुपचंद सहारे, जिल्हा बिव्हिफ संयोजक विजय ढोबळे, सिद्धार्थ ढेपे , हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष रवींद्र भगत, उपाध्यक्ष मोरेश्वर जवादे, बंडू थुल, अनिल नगराळे, मनोज कळसकर, रामु वासेकर, प्रकाश पाणबुडे, गणेश बावणे, प्रदीप हाडके, अमित वासनिक, राजकुमार गाठले, आर्विचे वाळके साहेब, राजकुमार मेश्राम, विकास कोल्हेकर, नितीन नरांजे, चंद्रशेखर धोंगडे, विनायक पाटील, श्रीकांत पानेकर, सौरभ तुपे, प्रशांत भगत प्रामुख्याने उपस्थित होते

CLICK TO SHARE