दिड लाखाचा सुगंधीत तंबाखू जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

क्राइम

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील वडगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेने एका घरी धाड टाकत दिड लाखाचा सुगंधित तंबाखू जप्त करून एकाला अटक केली आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी जिल्ह्यात सुरू असलेला प्रतिबंधित सुगंधित तंबाखूच्या व्यापारावर आता प्रतिबंध घालणे सुरू आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक, यांनी कारवाईची सूत्रे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्याकडे सोपवली.दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने ५ मार्च रोजी रात्री अंदाजे ९.३० वाजताच्या सुमारास वडगाव येथील अजय विजय गुंडोजवार याच्या घरी धाड टाकली असता त्याठिकाणी सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला.

CLICK TO SHARE