अवैध वाळू वाहतुकी विरोधात शिवसेना (उबाठा) आक्रमक वाळू माफियांवर तत्काळ कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन

अन्य

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपुर, वडनेर, पोहणा भागातून मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी होत आहे. यामुळे शासनाचा महसूल बुडत असताना अपघाताला चालना मिळत आहे. मागोल महिण्यात वाळू भरलेल्या टिप्परच्चा धडकेत एका व्यक्तीचा बळी गेल्यानंतरही पोलीस व महसूल प्रशासन कारवाईकरायला तयार नसल्याने शिवसेना (उद्धव बाळा साहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक पावित्रा घेत तात्काळ चाळूमाफिया व त्यांना सहकार्य करणाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.या संदर्भात जिल्हाप्रमुख श्रीकांत मिरापूरकर, तालुकाप्रमुख सतीश धोवे, नगरसेवक मनीष देवडे, वर्धा तालुकाप्रमुख सुभाष कडे यांच्या नेतृत्चात जिल्हाधिकारी तथा पोलीस अधीक्षक, वर्धा यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये १० फेब्रुवारीला अल्लीपुर ते धोत्राकासाररस्त्यावर एम एच ३२बी६४२६ ऑटो वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने धडक दिल्याने सर्व प्रवासी जखमी झाले. त्यातील विलास शंकर हजारे हे गंभीर जखमी झाल्यामुळे सावंगी रुग्णालयात. २९ रोजी त्यांचा मृत्यू झाला. विभागप्रमुख गोपाल मेघरे यांनी टिप्पर मालक व चालकावर सदोष मनुष्यवधाचागुन्हा दाखल करण्याकरिता घटनेची संपूर्ण माहिती अल्लीपुर पोलीस स्टेशनला दिली. तसेच टिप्पर क्रमांक एम एच २९ बी ई ४३५२ पोलीस स्टेशनला जमा केला. परंतु अद्याप अल्लीपूर पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही.अल्लीपूर, वडनेर, पोहणा याभागातून सतत मोठ्या प्रमाणात टिप्पर, ट्रैक्टर व ट्रकद्वारे रेतीचोरी होत आहे. पण संबंधित पोलीस स्टेशन व महसूल अधिकारी कुठलीच कारवाई करताना दिसून येत नाही. त्यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. त्यामुळेच रेतीमाफियांचे मनोबल उंचावत असून कोणाचे प्राण गेले तरी चालेल, पण रेतीचोरी बिनधिक्कतपणे करीत आहे. एकुणच या माफियांपुढे महसूल आणि पोलीस विभाग हतबल झाल्याचे दिसून येते तेव्हा संबंधित रेतीमाफिया, पोलीस विभाग व महसूल विभागातील अधिकाऱ्यांवरनियमाने कठोर कारवाई करावी, अन्यथा शिवसेनेद्वारे अल्लीपुर येथे रस्त्यावर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे, यावेळी निवेदन देताना सर्कल प्रमुख गोपाल मेघरे, माजी नगरसेवक शंकर मोहमारे, उपशहरप्रमुख संजय पिंपळकर, अल्लीपूरचे शाखाप्रमुख संदीप नरड, मृतकाचे बंधू विकास हजारे, रायुकांचे सचिन पारसडे, शिवसेना संघटक विकास जोगे, विद्यार्थी संघटना अध्यक्ष नितीन शेलकर गांच्यासह शिवसेना (उबाठा) पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

CLICK TO SHARE