पेट्रोलपंपावर अनेक सुविधांचा अभाव

अन्य

तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगाव

आमगांव तालुकातील प्रत्येक पेट्रोल पंपावर शुद्ध पाणी, वाहनांसाठी मोफत हवा व स्वच्छ प्रसाधनगृह असणे आवश्यक आहे. या सुविधा नसलेल्या पंपाच्या जागेचे नाहरकत प्रमाणपत्र रद्द करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. मात्र जिल्ह्यातील अनेक पेट्रोपंपावर कुठे प्रशासनगृहाचा अभाव तर कुठे वाहनांसाठी मोफत हवा भरण्याची सुविधाच मिळत नसल्याचे अनेक वाहन धारकांना अनुभवावयास मिळते. अनेक पेट्रोलपंप संचालकाद्वारे सुविधाच पुरविल्या जात नसल्याचे चित्र आहे. मात्र कारवाई होत नसल्याने या संचालकांचे चांगलेच फावले आहे. सरकारी कंपन्यांमार्फत पेट्रोल व डिझेलचा पुरवठा केला जाते. तसेचपेट्रोल पंपावर दर दिवशी लाखो रुपयांची उलाढाल होते. त्यामुळे पेट्रोलपंप चालकाने काही सामाजिक सुविधा नागरिकांना उपलब्ध करुन देणे शासनाने बंधनकारक केले आहे.यामध्ये स्वच्छ पाणी, वाहनांमध्ये मोफत हवा भरणे व प्रसाधनगृह असणे आवश्यक आहे. पेट्रोलपंपावर प्रसाधनगृह आढळून येतात, मात्र याचा वापर केवळ येथील कर्मचारीच करीत असल्याचे निदर्शनास येते. बहूतेकदा तर प्रसाधनगृहाला टाळेच लागलेले दिसते. अनेक पेट्रोपंपावर पाण्याची सुविधा उपलब्ध असली तरी त्याला पाणीच येत नसल्याच्याही तक्रारी आहेत. शहरातील सर्वच पेट्रोलपंपावर पिण्याचे पाणी, प्रसाधनगृहाची सुविधा आहे. मात्र बहुतेक पेट्रोलपंप संचालकांनी मोफत हवा भरण्याच्या सुविधेकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास येते. *या’ सुविधा पंपावर आवश्यकच* पेट्रोलपंपावर वाहन धारकांसाठी पिण्याचे शुद्ध पाण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे.वाहनधारकाने मागणी केल्यास मोफत हवा भरून देणे गरजेचे आहे. तसेच प्रसाधनगृह असणे आवश्यक आहे. शासनाने प्रत्येक पेट्रोपपंधारक या सुविधा पुरविण्याचे निर्देश देण्यातआले आहेत. सुविधा नसल्यास संबंधिताचा परवाना रद्द केला जाऊ शकतो. *हवा भरण्यासाठी दहा रुपयांचा खर्च* पेट्रोलपंपावर हवा भरण्याची सुविधा मोफत उपलब्ध करुन दिली जाते. मात्र अनेकांना याबाबत माहितीच नसते. त्यामुळे खासगी व्यक्तीकडून हवा भरुन घेतली जाते. यासाठी दुचाकी वाहन धारकांना 10 ते 20 रुपयांचा खर्च करावा लागत आहे. पेट्रोलपंप चालकांनी मोफत हवेची सुविधा देणे गरजेचे आहे.

CLICK TO SHARE