काटोल नरखेड विधानसभा क्षेत्रातील एकही पांदन रस्ता सुटणार नाही-चरणसिंग ठाकूर

सोशल

प्रतिनिधी:साजिद पठाण नागपुर

काटोल – काटोल तालुक्यातील मा.श्री,देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री म.रा.तथापालकमंत्री नागपूर जिल्हा, मा.श्री,चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब,प्रदेशाध्यक्ष भाजपा वि.प.स. यांच्या सहकार्य आणि काटोल नरखेड विधानसभेचे प्रमुख श्री चरणसिंग ठाकूर प्रयत्नाने ग्रामपंचायत डोरली(भिंगारे ) येथील विविध विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी चरणसिंग ठाकूर हे बोलत होते. ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या सद्गुरु देवस्थान असलेल्या मंदिराकरिता लवकरच तीर्थक्षेत्रातुन 25 लक्ष रुपये देण्यात येणार आहे. तसेच लवकरच वन जमिनी संबंधी शासन दरबारी पाठपुरावा करून पट्टेवाटप संबंधी कारवाई करण्याचे चरणसिंग ठाकूर यांनी सांगितले. कार्यक्रम स्थळापासून जवळच असलेल्या गावातील लाभार्थ्यांच्या घरापर्यंत देशाचे प्रधानमंत्री मा.नरेंद्रजी मोदी यांचा संदेश घेऊन लाभार्थी संपर्क अभियानाची काटोल नरखेड विधानसभा मध्ये सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमाचे उद्घाटन सुधाकरजी कोहळे,जिल्हाध्यक्ष भाजपा नागपूर ग्रामीण, विशेष अतिथी अरविंदजी गजभिये,तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चरणसिंगजी ठाकूर काटोल नरखेड विधानसभा प्रमूख यांच्या उपस्थितीत पार पडला.यावेळी उकेशजी चव्हाण,दिनेशजी ठाकरे, शामरावजी बारई, हेमंत जिचकार, मुरलीधरजी रोकडे,भूषण भोयर, शुभम रोकडे,ग्रामपंचायत सरपंच सुनंदाबाई रोकडे,उपसरपंच राजेंद्र भोयर, ,ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या संख्येने गावातील नागरिक व महिला उपस्थित होते.

CLICK TO SHARE