काटोलमध्ये “इस्त्रो” च्या अंतराळ प्रदर्शनी बसचे आगमन,बनारसीदास रुईया हायस्कूलमध्ये जंगी स्वागत

टेक्नॉलॉजी

प्रतिनिधी:साजिद पठाण नागपुर

काटोल:विदर्भातील “स्पेस ऑन व्हील्स” चे भ्रमण काटोल, भारतीय अंतराळ संशोधन संस्था “इस्त्रो’ची अंतराळ महायात्रा प्रदर्शनी बस रविवारी काटोल शहरात दाखल झाली. ही अंतराळ महायात्रा विदर्भातील 11 जिल्ह्यातून प्रवास करणार आहे.”इस्त्रो” च्या अंतराळ प्रवास बसचे मॉडेल पाहण्याची आणि समजून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. काटोल शहरातील बनारसीदास रुईया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानात बसचे जंगी स्वागत करण्यात आले.संस्थेचे अध्यक्ष डॉ.दिलीप चांडक, उपाध्यक्ष अशोक भुतडा, सचिव प्रकाश नबिरा, कोषाध्यक्ष डॉ.ओमप्रकाश अग्रवाल, सहसचिव संकेत चांडक, जवाहरलाल चांडक, सत्येंद्र खोना, गिरीश लड्डा, नरेश घोडे, प्रतीक खोना, चेतन कडू, डॉ.गोविंद भुतडा, प्राचार्य विजय राठी, उपप्राचार्या अंजली प्रधान, वंदना काळे, राधा चौहान, माधवी खिंची, आशा बारई, सुषमा दारोकर, नमिता खुटे, विजय कुरेकर, सुनील खोब्रागडे, नरेंद्र चौहान, विठ्ठल ढगे,आदी सर्व शिक्षकवृंद स्वागत करिता उपस्थित होते. विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची माहिती मिळावी, विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याची माहिती व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारच्या वतीने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याचे विज्ञान भारतीच्या समन्व धोयक मनीषा घारे यांनी सांगितले. काटोल शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या अंतराळ प्रदर्शनाचा लाभ घेतला” इस्त्रोतर्फे”चित्रकला व रांगोळी स्पर्धा इस्त्रोने विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते .चित्रकला व रांगोळी या दोन्ही स्पर्धेची थीम “इस्त्रो’ होती. विद्यार्थ्यांना इस्त्रोतर्फे पारितोषिक व प्रमाणपत्रे देण्यात आली.विद्यार्थ्यांना इस्त्रोचे अंतराळ प्रदर्शन व मॉडेल्स पाहण्याची संधी मिळाली. शोध लावण्याची विद्यार्थ्यांमध्ये अनुभूती निर्माण झाली. विज्ञान भारतीच्या मनीषा घारे आणि सतीश घारे यांनी सांगितले की, केंद्र सरकारसोबत राष्ट्रीय पातळीवर सर्व गावात शहरात.अंतराळ संशोधनाची सर्व विद्यार्थ्यांना ही माहिती उपलब्ध करून देण्याचा करार झाला होता, या करारानुसार १५ ऑगस्ट 2023,ला.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अंतरीक्ष महायात्रा बसचा शुभारंभ.झाला आतापर्यंत पाच लाख विद्यार्थ्यांनी लाभ.घेतला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य विजय राठी यांनी केले, सूत्रसंचालन प्राध्यापक हिरामण सोमकुवार यांनी केले, उपप्राचार्या अंजली प्रधान यांनी आभार व्यक्त केले.नारायण कावडकर, धीरज ढोले, प्रवीण चौधरी यांनी सहकार्य केले.

CLICK TO SHARE