जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत निवेदिता तायवाडे द्वितीय,अंत्योदय महाविद्यालय देवग्राम

एज्युकेशन खेल

प्रतिनिधी:साजिद पठाण नागपुर

जलालखेडा (त.10) जल जीवन मिशन अंतर्गत तालुका स्तरावर संपन्न झालेल्या वक्तृत्व स्पर्धे मधील प्रथम तीन क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यासाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन ६ मार्चला आबासाहेब खेडकर सभागृह जिल्हा परिषद नागपूर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत अंत्योदय महाविद्यालय देवग्राम येथील वर्ग ११ वी कला शाखेची विद्यार्थिनी कु.निवेदिता रवींद्र तायवाडे या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक पटकावला. तिला पारितोषिक म्हणून ११ हजार रुपये आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. निवेदिताला मिळालेल्या या यशाबद्दल अंत्योदय मिशन संस्थेचे संस्थापक डॉ.भाऊसाहेब भोगे,संस्थेचे अध्यक्ष डॉ.भास्करराव विघे, प्राचार्य डॉ. देवेंद्र भोंगाडे, उपप्राचार्य डॉ.राजू श्रीरामे, उपप्राचार्य प्रा.नागेश ढोबळे तसेच सर्व प्राध्यापक वृन्दानी तिचे अभिनंदन केले आहे पारितोषिक स्वीकारताना निवेदिता तायवाडे.

CLICK TO SHARE