नाटिकेच्या माध्यमातून समाजप्रबोधन काळाची गरज- माजी आमदार प्रा.राजु तिमांडेवाघोली येथे नाटिकेचे आयोजन.

अन्य

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

दिनांक १० मार्च २०२४ रोजी हिंगणघाट तालुक्यातील वाघोली येथे नाट्यनरेश रंगभूमी वडसा प्रस्तुत “वारस” या नाटिकेचे आयोजन केले असता उद्घाटन कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे संघटक-सचिव तथा माजी आमदार प्रा.राजु तिमांडे उपस्तीत राहुन मार्गदर्शन केले. उद्घाटना प्रसंगी प्रतिमेस माल्यारपण करुन दीपप्रजवलन करुन कार्यक्रमाची सुरवात केली व आयोजक समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रामुख्याने उपस्तित हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी,राष्ट्रवादी अजित पवारचे जिल्हाध्यक्ष शरद शहारे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवारचे विधानसभा अध्यक्ष- माजी पं.समिती सभापती संजय तपासे,अविनाश नावरखेले, वाघोलीचे सरपंच प्रशांतजी खोडणकर,उपसरपंच वाघोली बंडूजी महाकाळकर,प्रफुल बेले तसेच आयोजक समितीचे पदाधिकारी सदस्य,वाघोली गावातील व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी आमदार प्रा.राजू तिमांडे मार्गदर्शन करतेवेळी म्हणाले की आज शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक समाजातील घटकांना नाटिका, मैदानी खेळ,प्रबोधन हे काळाची गरज आहे. यामुळे गावातील एकोपा तयार होऊन. आपल्या भारतीय संस्कृतीत या नाट्य आणि बाकीच्या वेगवेगळ्या कला नेहमी प्रमाणे सुरु आहे.या झाडीपट्टीतील विविध नाटिकेच्या माध्यमातून अनेक कलावंत घडत आहे. अनेक घडलेले कलावंत आज मोठ्या पडद्यावर काम करत आहे. गरीब कलावंतांना सुद्धा एक स्थान मिळत आहे.त्याच माध्यमातून आपले झाडीपट्टीतील नाट्य कलावंत समाजातील जिवंत चित्र हे आपल्या समोर अभियानाचा माध्यमातून मांडत असतात.आपल्या समाजात, कुटुंबात जन्मलेल्या लेकिंना, सूनांना, आईंना, बहिणींना एक स्थानाचा मान देतो आहे. हे भारतीय परंपरा आहे.नाटिकेच्या माध्यमातून समाजप्रबोधन होणे काळाची गरज आहे असे मत व्यक्त करत अत्यंत चांगल्या प्रकारचे आयोजन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले असे वाव देत माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी कार्यक्रमाल शुभेच्छा दिल्या.

CLICK TO SHARE