समाज भवन भूमिपूजन सोहळा मा.रणजित दादा कांबळे यांचे हस्ते पार पडला

अन्य

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर्

स्थानीक जयभीम वार्डमध्ये समाज भवन बांधकाांसाठी वॉर्ड मेंबर बच्चू वाटखेडे , हारून अली यांनी सतत आमदार रणजित दादा कांबळे यांचे कडे पाठपुरावा केला व दादाने त्यांच्या पाठपुराव्याकडे लक्ष केंद्रित करून महाराष्ट्र शासनाच्या पंचायत राज व ग्रामीण विकास विभागाच्या २५१५याजने अंतर्गत २०लाख रुपयाचा निधी समाज भवन बांधकामा करीता मंजूर करण्यात आला.आज १० फेब्रुवारीला सकाळी ११वाजता समाज भवन भूमिपूजन सोहळा मा. आमदार रणजित दादा कांबळे यांचे हस्ते पार पडला यावेळी सरपंच नितीनजी चांडणखेडे , श्रीराम साखरकर , बालूभाऊ महाजन , शिरसगावचे सरपंच राजुभाऊ मंगेकर , तंटामुक्ती अध्यक्ष धनराज सुपारे , सुरेश सातोकर , धनराज घुसे , माजी सरपंच गजुभाऊ नरड , प्रा. विनोदजी मुडे , ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय गो. दिवटे , ग्रा. प. सदस्य सचिन पारसडे , बच्चुभाऊ .वाटखेडे , हारून अली , सतीश काळे , सविता साखरकर , शिवसेनेचे बालुभाऊ घुसे , संदिप नरड ,ग्राम. प. कर्मचारी व गावातील नागरिक मोठया संख्येने उपस्थीत होते.

CLICK TO SHARE