राजुरा तालुका ची शांतता बैठक संपन्न,शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी केले आव्हान

अन्य

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर.

अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु यांची उपस्थिती राजुरा तालुक्यातील पोलिस उपविभाग अंतर्गत येत असलेल्या भागातील पोलिस पाटील व शांतता समिती सदस्य यांची संयुक्त मीटिंग उपविभागीय पोलिस कार्यालय राजुरा येथ आयोजित करण्यात आली होती.सदर शांतता बैठक अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर रीना जनबंधु यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी उपविभागीय अंतर्गत येत असलेल्या सर्व पोलीस ठाण्याचे ठाणेदार तसेच संबंधित अधिकाऱी उपस्थित होते.त्याचप्रमाने निमंत्रित शांतता समितीचे सदस्य व पोलिस पाटील मोठ्या संख्येने सहभाग घेत आपल्या परिसरातील परिस्थीती ची मांडणी केली.यावेळी उपस्थित सदस्यांना संबोधित करताना अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु यांनी सामाजिक सलोखा व शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपली प्रशासकीय यंत्रणेला सहकार्याची अपेक्षा आहे. तेव्हा येत्या काळात लोकसभा निवडणुकीच्या काळात आचार संहिता दरम्यान विवीध धार्मिक सण व महापुरुषांच्या जयंती साजरी केली जाते.मात्र या दरम्यान कुठलेही गालबोट न लागता आगामी सण उत्साह रितसर कायद्याच्या नियमांत साजरा करण्या करिता आप आपल्या भागात जनजागरण करावे व त्यात आचार संहिता दरम्यान राजकारण चा रंग न चढवता पोलीसांना मदत करावे अशी अपील अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु यांनी उपस्थित सदस्यांना केली . प्रामुख्याने आपल्या भागात आज गुन्हेगारीत वाढ होताना दिसून येत आहे.तेव्हा आपल्या भागात होत असलेल्या अवैध दारू विक्री.अवैध जुगार व रेती तस्करी संदर्भात कुठलीही माहिती असल्यास आपल्या नजीकच्या पोलिस स्टेशन ला यांची माहिती द्या.जेनेकरुन आपल्या मदतीने भविष्यात होणारे गुन्हे टाळता येईल असे निर्देश उपस्थित सदस्यांना देण्यात आली.

CLICK TO SHARE