जागतिक महिला दिनानिमित्ताने काटोल मधील महिलांचा जल्लोष

अन्य

प्रतिनिधी:साजिद पठाण नागपुर

सावित्रीबाई फुले विचार मंच काटोल द्वारा महात्मा सभागृह काटोल येथे फुले स्मृतिदिन तथा जागतिक महिला दिन नाचे औचित्य साधून महिलांनी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन महिला प्रबोधनासोबतच जल्लोष साजरा केला. अनेक स्पर्धांमध्ये काटोल मधील शेकडो महिलांनी यामध्ये भाग घेतलेला होता.एकल डान्स स्पर्धा, ग्रुप डान्स , मी सावित्री बोलते एकपात्री नाटिका ,भारुड, आम्ही दोघी सारख्या नाटिका, गीत गायन स्पर्धा अशा अनेक स्पर्धेचे आयोजन करून विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले .यावेळी काटोल शहरातील बहुसंख्या ग्रुपने यामध्ये सहभाग घेतलेला होता.या स्पर्धांचे परीक्षक म्हणून आणि प्रमुख पाहुणे म्हणून जिजाऊ ब्रिगेडचे अध्यक्षा मोहिनीताई कडू,कवयित्री जयाताई बोरकर तथा दीक्षाताई टेकाडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सावित्रीबाई विचार मंच अध्यक्षा सौ वैशाली संजय डांगोरे होत्या.या अनोख्या आणि आगळ्यावेगळ्या जल्लोषाच्या कार्यक्रमांमध्ये कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्याताई कांबळे तथा प्रतिभाताई भेलकर यांनी केले. प्रास्ताविक सचिव भैरवीताई टेकाडे तर आभार प्रदर्शन रजनीताई नेरकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कविता कांडलकर ,मोना खरबडे ,कांचन टेंभे, मंगला श्रीखंडे, वैशाली श्रीखंडे, वंदना डांगोरे ,सुवर्णा पवार, अर्चना वरोकर, उषाताई भोयर, जयश्री वरोकर, लताताई बोढाळे, योगिता गायधने , मोनाली पवार, कल्पना गोमासे, मंदा तिजारे, शिल्पा बोढाळे, सुनीता कांबळे, माधुरी टेकाडे, संध्या नेरकर, अंजली भेलकर,जया चोरकर, सोनाली बोढाळे, शितल चर्जन, नंदा भोयर, आदींनी सहकार्य केले.

CLICK TO SHARE