जागतिक महिला दिन महोत्सवाचे मंडळाद्वारे थाटात आयोजन

अन्य सोशल

प्रतिनिधी:साजिद पठाण नागपुर

काटोल तालुका ज्येष्ठ नागरिक मंडळ काटोल द्वारा मंडळाच्या स्थानिक विरंगुळा केंद्रात जागतिक महिला दिन महोत्सवाचे दिनांक १० मार्च 2024 ला आयोजन करण्यात आले. जेष्ठांनी या वयात कोणतीही चिंता मनाशी न बाळगता प्रेक्षणीय व दर्शनीय स्थळे पाहण्यासाठी मनसोक्त फिरावे व आयुष्याच्या उत्तरार्धात जीवनाचा आनंद घ्यावा असे उद्गार कार्यक्रमाच्या उद्घाटिका सौ. वैशालीताई ठाकूर यांनी काढले. काटोल नगरीच्या माजी नगराध्यक्षा सौ. वैशालीताई ठाकूर यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे थाटात उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी मंडळाच्या संचालिका श्रीमती दुर्गाताई कडू, प्रमुख अतिथी डॉ.सौ पूजाताई राकेश वानखेडे (आयुर्वेद व पंचकर्म तज्ञ), ॲड.सौ वंदनाताई विवेकराव चौधरी तर विशेष अतिथी म्हणून लाभलेल्या स्थानिक ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या श्रीमती इंदुमती धापोडकर, यांचेसह मंडळाचे अध्यक्ष श्री रमेशजी तिजारे , उपाध्यक्ष शामरावजी झामडे, सचिव श्री गजाननराव भोयर मंचावर उपस्थित होते. श्रीमती बेबीताई रोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वागत गीताने पाहुण्याचे स्वागत केले. व निमंत्रित पाहुण्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उतार वयात ज्येष्ठांना होणारा संधिवात, महिलांचे आरोग्य, त्यांचा आहार, विहार याविषयी डॉ.सौ पूजाताई वानखेडे यांनी विशेष मार्गदर्शन केले. मानवाचे जीवनात ईश्वराचे अमूल्य स्थान आहे. ईश्वर चिंतनाने मनाला शांती लाभते. यासाठी सर्वांनी ईश्वराला जवळ करा. असा मोलाचा आध्यात्मिक सल्ला ब्रह्मकुमारी श्रीमती इंदुमती धापोडकर यांनी दिला. महिला संबंधाने असलेल्या सर्व कायद्याच्या कलमासह सविस्तर माहिती कायद्याच्या जाणकार ॲड.सौ वंदनाताई चौधरी यांनी दिली. श्रीमती दुर्गाताई कडू यांनी अध्यक्षिय भाषणातून आईच्या महती वर एक गीत गायन केले. त्याशिवाय श्रीमती रंजनाताई तिजारे, सुधाताई राऊत, खंते मॅडम, श्री नामदेव ठोंबरे यांनी सुद्धा विशेष गीत गायन केले त्यांना तबलजी व हार्मोनियम वादकाने विशेष साथ दिली. उपस्थित 16 ज्येष्ठांचा पेन व डायरी देऊन सामूहिक वाढदिवस साजरा करण्यात आला व त्यांना निरामय आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव श्री गजाननराव भोयर, संचालन श्रीमती बेबीताई रोडे तर आभार उपाध्यक्ष शामरावजी झांमडे यांनी मानले. कार्यक्रमाचे सुरुवात स्वागत गीत व “खरा तो एकची धर्म” या समूहगीताने तर समारोप पसायदानाने करण्यात आला या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी श्रीमती बेबीताई रोडे, सुनंदाताई हिरूडकर, सहसचिव अरुण पुंड, कोषाध्यक्ष रुपराव राऊत, संचालक हितेंद्र गोमासे, रामदास कळंबे, हिरामण सकर्डे व अशोकराव ढेंगरे यांचे विशेष सहकार्य लाभले .

CLICK TO SHARE