रेल्वे उड्डान पुलावर रंगकाम करतांना खाली पडुन दोन मजुरांचा मृत्यू

अन्य

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

हिंगणघाट जवळ असलेल्या रेल्वे उड्डानपुलावर रंगकाम करतांना दोन मजुर वणा नदीच्या पात्रात पडुन ठार झाले. हिंगणघाट वरुन दिल्ली ते कन्याकुमारी असा वर्दळीचा रेल्वे महामार्ग आहे. वर्धा व हिंगणघाटच्या मध्ये हिंगणघाट जवळ वणा नदीवर लोखंडी रेल्वे उड्डाणपुल आहे. या उड्डाणपुलाला सध्या कंत्राटदाराच्या माध्यमातुन रंगकाम सुरु आहे. हे रंगकाम करतांना रविवार दिनांक १० मार्चला सायंकाळी ६ वाजता दोन रंगकाम करणारे मजुर वणा नदीच्या पात्रात पडले. त्यातील एक मजुर जागीच ठार झाला तर दुसर्याचा सेवाग्राम येथे उपचारा दरम्यान मृत्यु झाला.

CLICK TO SHARE