चंद्रपूर जिल्ह्यातील विविध प्रश्नांना घेऊन जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा सोबत बैठक

अन्य

जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर

आज चंद्रपूर जिल्ह्यातील विविध प्रश्नांना घेऊन जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा सोबत बैठक घेतली. यावेळी श्री माता महाकाली मंदिर चंद्रपूर येथे यात्रा परिसर विकास करणे, दे. गो. तुकूम द्वारका नगरी, वानखेडे वाडी, राष्ट्रवादी नगर परिसरात पूर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी नाले खोलीकरण व इतर उपाययोजना, सर्व शिधापत्रिका धारकांना नियमित धान्य पुरवठा होणे, संजय गांधी निराधार योजना अंतर्गत प्रलंबित प्रकरणे मार्गी लावणे, मा. सा. कन्नमवार बॅडमिंटन कोर्ट वरोरा नाका चंद्रपूर ला सुसज्ज व अद्यावत बांधकाम करणे, जिल्हा वार्षिक निधी (DPDC) अंतर्गत विद्युत खांब वाहिनी उभारण्याचे प्रस्तावित कामे मंजूर करणे यासह विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

CLICK TO SHARE