बिरसा क्रांती दलातर्फे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात

अन्य

शेदुर्जना घाट प्रतिनिधी(रवी वाहणे) अमरावती.

आज दिनांक 16 मार्च 2024 ला मोर्शी शहरात बिरसा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष प्रा. कमलनारायण उईके यांच्या पुढाकाराने बिरसा क्रांती दलातर्फे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षणाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बिरसा क्रांती दलाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी साहेब व तसेच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डी. बी. अंबुरे सर, महिला फोरमच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा गिरीजाताई उईके, विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष उत्तमराव मोडक, पश्चिम विदर्भ अध्यक्ष मारोती उईके, अमरावती जिल्हा महिला फोरम अध्यक्षा नलिनीताई सिडाम यांनी विशेष उपस्थिती लावली. राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी यांनी आपले प्रबोधन प्रशिक्षण दोन भागांमध्ये विभागून दिले. मध्यंतरापूर्वी भारतीय संविधान बनण्यापर्यंतची प्रक्रिया त्यासाठी 1719 च्या साऊथ ब्यूरो कमिशनच्या इतिहासापासून, फर्स्ट इंडिया ॲक्ट, सायमन कमिशन, चवदार तळे सत्याग्रह, गोलमेज परिषदा, पुणे करार, संविधानाची निर्मिती त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची महत्त्वपूर्ण भूमिका या विषयांना सखोल विस्तृतपणे न्याय दिला. दुसऱ्या भागामध्ये आदिवासी समाजाचा सांस्कृतिक संघर्ष व इतिहास या विषयावर ते विचार मांडले. तत्पूर्वी महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष डी. बी. अंबुरे सरांनी कार्यकर्ता प्रशिक्षण कशासाठी, कार्यकर्ता कसा असावा, कार्यकर्ता कसा नसावा, कार्यकर्त्यामध्ये कोणते गुण असावे या विषयांबरोबरच बिरसा क्रांती दलाच्या स्थापनेमागील भूमिका सुद्धा विशद केली. या प्रशिक्षण शिबिरासाठी बिरसा क्रांती दलाचे मोर्शी तालुकाध्यक्ष जयकिशन धुर्वे, मोर्शी शहराध्यक्ष रवी परतेती व माजी नगरसेविका सुनीताताई कुमरे (मसराम) यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या मेहनतीमुळेच प्रशिक्षण शिबिर यशस्वी झाले. वरुड व मोर्शी तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने यात सहभाग नोंदविला. बिरसा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष प्रा. कमलनारायण उईके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सादर केले. प्रशिक्षण संपल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वरुड तालुक्याच्या कार्यकारिणीतील अध्यक्षासहित सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले. जामगाव(ख.), बेनोडा व करजगाव येथील शाखाध्यक्षांना देखील नियुक्तीपत्र देण्यात आले. मुळशी तालुक्याचे अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र बहाल करून बिरसा क्रांती दलाच्या मोर्शी शहराध्यक्षपदी रवी परतेती यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा. कमलनारायण उईके, बिरसा एम्प्लॉय फोरमचे जिल्हाध्यक्ष महेंद्र कोडापे, बिरसा क्रांती दलाचे जिल्हा उपाध्यक्ष अतुल प्ररतेकी, उपाध्यक्ष पवनसिंग तुमडाम, जिल्हा संघटक ॲड. पवन वाडीवे, कॉ. अरविंद वानखडे, ॲड. योगेश नागले, सांची नागले, प्रा. आनंद तायडे सर, युवा उद्योजक उमेश फुले, संजय डवरे, ॲड. अनंत वानखडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अनिकेत परतेती, मनोज उईके, युवा वरुड तालुकाध्यक्ष शंकर सिरसाम, जयकिशन धुर्वे, विजय सिरसाम, प्रेम मडावी, सुनिता कुमरे, विकी उईके, अंबाड्याचे गजानन धुर्वे, इत्तमगावचे गजानन धुर्वे, विशाल धुर्वे, राहुल उईके, संजय युवनाते, वनराज युवनाते, नितेश उईके, अजय कवडे, राजेश धुर्वे, राजकुमार कुमरे, महादेव कवडेती, विजय परतेती, शंकर पंधरे, गोकुल मडावी, विजय इवने, प्रवीण धुर्वे, चिखलदरा शहराध्यक्ष कासदेकर, शिवा मेश्राम, देवा दहिकर, अक्षय जांभे व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

CLICK TO SHARE