बल्लारपूर तालुक्यातील ५०१ नवसाक्षारानी दिली परीक्षा ५४ परीक्षा केंद्रावर थेट होते गटशिक्षण अधिकाऱ्यांचे लक्ष

अन्य

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : राष्ट्रीय मुक्त विद्यालयी शिक्षा संस्थान द्वारा केंद्रपुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याद्यान चाचणी परीक्षा रविवार १७ मार्च २०२४ ला घेण्यात आली. या परीक्षेला नव साक्षर आणि उत्स्फूर्त प्रतिसाद देत १५ वर्षांवरील ६४५ नवसाक्षरांपैकी ५०१ जणांनी परीक्षा दिली व या परीक्षेवर थेट गट शिक्षणाधिकाऱ्यांचे लक्ष होते त्यांच्या मार्फत गटसाधन / बल्लारपूर : राष्ट्रीय मुक्त विद्यालयी शिक्षा संस्थान द्वारा केंद्रपुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याद्यान चाचणी परीक्षा रविवार १७ मार्च २०२४ ला घेण्यात आली. या परीक्षेला नव साक्षर आणि उत्स्फूर्त प्रतिसाद देत १५ वर्षांवरील ६४५ नवसाक्षरांपैकी ५०१ जणांनी परीक्षा दिली व या परीक्षेवर थेट गट शिक्षणाधिकाऱ्यांचे लक्ष होते त्यांच्या मार्फत गटसाधन व्यक्ती व केंद्रप्रमुख यांनी ५४ परीक्षा केंद्रावर जावून बोर्ड परीक्षेच्या धर्तीवर व्यवस्था पाहणी केली.व्यक्ती व केंद्रप्रमुख यांनी ५४ परीक्षा केंद्रावर जावून बोर्ड परीक्षेच्या धर्तीवर व्यवस्था पाहणी केली.केंद्र सरकारने २०३७ पर्यंत भारत साक्षर करण्याचा उद्दिष्ट ठेवुन राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्था द्वारा पुरस्कृत उल्लास साक्षरता अभियान मागील चार महिन्यांपासून राबविण्यात येत आहे.यासाठी १४६ प्रशिक्षण स्वयंसेवकांची निवड करून त्यांच्याद्वारे प्रत्यक्ष निरक्षर व्यक्तीच्या घरी जाऊन त्यांना पायाभुत साक्षर करण्यासाठी संख्याज्ञान, लिहणे वाचणे शिकवण्यात आले व त्या अनुषंगाने त्यांची परीक्षा घेण्यात आली.त्यामध्ये बल्लारपूर तालुक्यातील ५४ परीक्षा केंद्रावर सदर परीक्षा घेण्यात आली ही परीक्षा कठीण जरी असली तरी नवसाक्षारानी जिवनातिल एक आव्हान समजून परीक्षा दिली व पेपर सोडविला,त्यांचा आत्मविश्वास पाहुन ते नक्कीच साक्षर होणार आणि त्यांना तसे गुणपत्रक व प्रमाणपत्र लवकरच शासनाकडून मिळणारा अशी आशा निर्माण झाली आणि एकंदरीत परीक्षा सुरळीत पार पडल्या

CLICK TO SHARE