सहाय्यक निवडणूक अधिकारी शिल्पा सोनाले यांची माहिती

चुनाव

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केल्याने हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. वर्धा लोकसभा जागेसाठी दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. देशभरात 4 जून 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. ही निवडणूक पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी तालुका प्रशासन सज्ज असल्याची माहिती उपविभागीय तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी शिल्पा सोनाळले यांनी पत्रकार परिषदेत दिली. वर्धा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या घोषणेसंदर्भात दिनांक १८आज पत्रकार परीषदेचे आयोजन करण्यात आले.

CLICK TO SHARE