जंगलात फिरताना दोन इसमाला वन विभागाने घेतले ताब्यात

अन्य

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर: वन विभागाने नागरीकांना जंगलात जाऊ नये असे आव्हान केल्या नंतरही नागरिक जंगलात आपला जीव उच्च गमावतात.जंगलात आदमखोर वाघ असल्याने वाघाने आक्ता पर्यंत तिन-चार इसमावर हल्ला करून शिकार केली आहे.एका इसमाचे शरीराचे अर्धे मास भक्षण केले आहे.सामाजीक संघटना आणि राजनीतिक पक्षाने वन विभागाला निवेदन देऊन आदमखोर वाघाचा बंदोबस्त करावे अशी विनंती केली आहे.त्यानुसार वन विभागाने आदमखोर वाघाला पकडण्यकरीता बंदोबस्त करीत लाईव्ह कॅमेरा लावलेला आहे. जंगलात राखीव वन खंड क्र.493 मधील वनात दोन इसम 1) चंदन तिलोकानी गांधी वार्ड 2) सारंग राहुलगडे साईबाबा वार्ड बल्लारपूर यांनी अपप्रवेश करुन जंगलात फिरत असताना वनातील लाईव्ह 📷 कॅमेरा मध्ये दिसुन आले. वनविभागाचे अधिकारी यांनी दोघांनाही ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांचा जवळ ज्वलनशील साहित्य आढळून आले त्यामुळे वनात अपप्रवेश करुन वनात आग लावण्याचा दुष्टिने ज्वलनशील साहित्य नेत्या प्रकरणी व आदमखोर वाघ जोरबंद मोहिमे दरम्यान शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल त्याचे विरुद्ध भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26(1)ब,ड, नुसार प्राथमिक वन गुन्हा क्र.08962/224042 दि. 17-03-2024 अन्वये वन गुन्हा नोदवुन त्याचे कडील साहित्य (मोटरसायकल व मोबाईल) जप्त करण्यात आले.वन विभाग वेळोवेळी आवाहन करीत आहे. की जंगलात आदमखोर वाघ असल्याने कोणीही कोणत्याही कामाकरीता जंगलात जाऊ नये आता पर्यंत तिन व्यक्तीचा नरडीचा घोट वाघाने घेतला आहे. जंगलात कोणीही व्यक्ती फिरत असताना दिसला कि वन विभाग कडक कारवाई करणार आहे. सदर प्रकरणात पुढील तपास मध्य चांदा वनविभाग चंद्रपूरचे उपवनरक्षक श्रीमती श्रेवता बोडु व सहाय्यक वनरक्षक आदेश कुमार शेडगे यांचा मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे हे करीत आहे.सदर कारवाई दरम्यान क्षेत्र सहायक पठाण, रामटेके,पुरी,वनरक्षक सुधीर बोकडे, तानाजी कामले, परमेश्वर आणकडे, रणजीत दुर्योधन,कु. वैशाली जेनेकर,माया पवार, सुनील नन्नावरे, मनोहर घाईत, धर्मेंद्र मेश्राम, देशमुख.व इतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

CLICK TO SHARE