प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट
वर्धा लोकसभेसाठी आज पर्यन्त कांग्रेस पक्षा कडुन उमेदवार दिल्या जात होता या वेळेस जी राजकीय पक्षात पडलेली फुट त्या वरून या वेळेस लोकसभे साठी ही जागा कांग्रेस पक्षाने अदला बदल करून राष्ट्रवादी शरद पवार गटाला ही जागा सोडली त्यामुळे राष्ट्रवादी पक्षा कडुन लोकसभा उमेदवारी साठी नाव पुढे आले, राजु तिमांडे, हर्षवर्धन देशमुख, समीर देशमुख, नितेश कराळे या मध्ये बाजी कोण मारणार ? मिळालेल्या माहिती वरून तर्क वितर्क जोडून कदाचित असे पण घडू शकते किंवा असे होईल याची पण शक्यता नाकारता येत नाही. वर्धा जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील नेता राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करून राष्ट्रवादी कडुन लोकसभा निवडनुक लढणार असल्याचे संकेत कानावर आले. शेवटी बेरीज वजाबाकी करून राष्ट्रवादी पक्षा कडुन लोकसभा जिकन्याचा प्रयत्न आहे.