अखेर कोणाच्या आशीर्वादाने जिल्ह्यामध्ये अवैध रेती उपसा सूरू
तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर
धोत्रा ते अल्लिपुर मार्गाने एकूर्ली फाट्याजवळ १८ मार्च रोजी रात्री रेतीची अवैध्य वाहतूक करणाऱ्या टिप्परणे मालवाहू २०७ ला धडक दिल्याने २०७ मध्ये भरुन असलेला चाना रस्त्यावर अस्ता वेस्त झालेला होता यात कोणतीही जीवित हानी झाली नाही धोत्रा अल्लिपुर मार्गावरील एका महिन्यात हा दुसरा अपघात झाल्याची घटना उघडकीस आली आहे रेतीची वाहतूक अल्लिपुर मार्गाने भर दिवसा व रात्री राजरोसपणे सुरू आहे मात्र याकडे महसूल अधिकाऱ्यांचे व पोलीस अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसून येत आहे त्यातच खूप साऱ्या रेती टिप्पर चे कागत पत्र सुध्दा नसल्याने हे टिप्पर रोडवर धावतात कसे यामुळे आरटीओ व पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे रेती घाट कुठलाही सूरू नसून इतक्या मोठया प्रमाणात रेतिची वाहतूक कुणाच्या आशीर्वादाने सूरू आहे हे सुध्दा कळत नाही यामध्ये निष्पाप लोकांचे बळी घेण्याचं काम इथे केल्या जात आहेत याला वाचा फोडणार कोण ? असा सवाल अल्लीपुर येथिल नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे घटनास्थळी ठाणेदार प्रफुल डाहुले व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचनामा केला व एम एच ४० बी एल ३२८४ हा रेती टीप्पर जप्त करण्यात आला पढील तपास अल्लिपुर पोलीस करीत आहे