उमेदवार म्हणून सुधीर मुनगंटीवार मैदानात

चुनाव

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर.

चंद्रपूर: राज्याचे सांस्कृतिक कार्य,वन व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी जाहीर केली.तेव्हा ते पोर्टब्लेअरला होते.यानंतर ते मुंबईला रवाना झाले.त्यानंतर तब्बल पाच दिवसांनी ते चंद्रपूरात दाखल झाले.लोकसभा मतदार संघात त्यांचा प्रतिस्पर्धी कोण हे अजुनही गुलदस्त्यात असतानाच ते मैदानात दाखल झाले आहेत.उमेदवारीसाठी इच्छुक नसलेले सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी चंद्रपूरात दाखल होताच गांधी चौकात सभा घेऊन विकास कामांची ग्वाही देत प्रचारालाही प्रारंभ केला.विधानसभेतुन सुरू झालेले चक्र लोकसभेतही कायम राहील.असा विश्वास देत विरोधकांना आव्हान प्रबळ असल्याची जाणीव करून दिली.यावेळी नागपूर विमानतळापासून ते घरी पोहचेपर्यंत त्यांच्या स्वागतासाठी खांबाडा, वरोरा,नंदोरी, भद्रावती,घोडपेठ,पडली, येथे कार्यरते मोठ्या प्रमाणावर उभे होते.

CLICK TO SHARE