देवळी विधानसभा मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आढावा

चुनाव

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून वर्धा लोकसभा मतदार संघात आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी देवळी तहसील कार्यालयात भेट दिली. यावेळी कार्यालयातील स्ट्राँग रुमची सखोल पाहणी करुन 45-देवळी विधानसभा मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीच्या कामकाजाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. आदर्श आचार संहितेचा भंग होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.उपजिल्हाधिकारी तथा 45 देवळी विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रियंका पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल चव्हाण, तहसीलदार दत्तात्रय जाधव, पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी एका इमारतीमध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त मतदान केंद्र असलेल्या नगर परिषद देवळी व आर. के कनिष्ठ महाविद्यालय नाचणगाव येथे भेट दिली. मतदान पथकांचे प्रशिक्षण स्थळांची देखील यावेळी पाहणी केली. मागील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 50 टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेल्या केंद्रांना भेट देवून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करण्याबाबत केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करुन यावेळी सूचना दिल्या.

CLICK TO SHARE