आमगांव तालुका गारपीट व वादळी वारा सायंकाळी बरसला पाऊस

अन्य

तालुका प्रतिनिधि अजय दोनोडे आमगांव

आमगांव : हवामान विभागानेशनिवारपासून चार-पाच दिवस पाऊस व वादळी वाऱ्याचा अंदाज वर्तविला होता.त्यानुसार, जिल्ह्यात शनिवारपासून ढगाळ वातावरण तयार झाले असून, वादळवारा सुटला होता. असे असतानाच आता हवामान विभागाने सोमवारी (दि. १८) व मंगळवारी (दि. १९) गारपीट व वादळी वाऱ्याचा अंदाज वर्तविला आहे.फेब्रुवारी महिन्यात अवकाळीपावसाने चांगलीच हजेरी लावली होती. त्यानंतर ६ मार्च रोजीही दमदार पाऊस बरसला होता. असे असतानाच हवामान विभागाने शनिवारपासून (दि. १६) पाऊस व वादळीवारा राहणार, असा अंदाज वर्तविला होता.हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरला व मंगळवार सायंकाळी अचानकच वातावरण पालटून ढग दाटून आले व वादळी वारा सुटला व गारपिटी पडली असून मात्र, पावसाने हजेरी लावली आहेराज्यात अन्यत्र गारपीट व पाऊस झाला. मात्र, जिल्ह्यात पाऊस बरसला नाही. त्यानंतर रविवारी (दि. १७) ढगाळ वातावरण तयार झाले होते व सायंकाळपर्यंत तरी पावसाने हजेरी लावली नव्हती.असे असतानाच हवामान विभागाने सोमवारी व मंगळवारी गारपीट व वादळी वाऱ्याचा शिवाय, बुधवारी (दि. २०) पावसाचा अंदाज वर्तविला आहे. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला आहे. असे असतानाच हवामान विभागाने सोमवारी व मंगळवारी गारपीट व वादळी वाऱ्याचा शिवाय, बुधवारी (दि. २०) पावसाचा अंदाज वर्तविला आहे. हवामान विभागाचा अंदाज जाणून मात्र शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे.

CLICK TO SHARE