राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

अन्य

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर.

भद्रावती: राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे महाराष्ट्र राज्य चिटणीस वेदांत भारत तालन व सरचिटणीस महेन्द्र भाऊ गाठे माननिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून आणि अध्यक्ष किरणजी पावसकर साहेब यांच्या आदेशाने आम्ही नगर परिषद भद्रावती कंत्राटी कामगार सर्व कर्मचारी (पाणी पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, अग्नी शामक विभाग,विज विभाग), असे संपूर्ण कंत्राटी कर्मचारी. एकजुट बांधली या कर्मचाऱ्यांचे जवळपास १० वर्षा पासुन पिळवनुक होत होती आणि किमान वेतन सुद्धा मिळत नव्हते आणि सर्व कर्मचारी साहेबांवर विश्वास ठेवून एकत्रित आले. राष्ट्रीय कर्मचारी सेनेची स्थापना केली आणि किमान वेतन प्रस्ताव लावुन धरला.त्या संदर्भात आज दि.१५/०३/२०२४ रोज शुक्रवार कामगार उपायुक्त चंद्रपूर यांच्या कडे बैठक झाली.त्या बैठकी नगरपरिषद चे अधिकारी व कंत्राटी कर्मचारी संदीपभाऊ चटपकार ,राजेश चव्हाण,अजय खांदारे,धनु माशिरकर,अजय सोनुने, दिलीप पचारे , धीरज मेश्राम व इतर सर्व कामगार उपस्थित होते त्या बैठकीत संबंधित विषय घेण्यात आले किमान वेतन देण्यात यावे व इतर सुविधा देण्यात यावे आणि तसेच माननीय जिल्हा धिकारी साहेब यांच्याकडे सुद्धा बैठक घेण्यात आली आणि महानगरपालिका आयुक्त यांना सुद्धा यांना निवेदन देण्यात आले.या सर्व मुद्यांवर कामगाराची पिळवणूक थांबवण्यात यावी तसेच यांना किमान वेतन लवकरात लवकर लागु यासाठी सदर बैठक घेण्यात आली.जर त्यांनी येत्या काळात किमान वेतन लागू केले नाही. तर राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.आशा इशारा राष्ट्रीय कर्मचारी कर्मचारी सेनेच्या पदाधिकारी यांनी दिला.

CLICK TO SHARE