प्रतिनिधी:निखिल ठाकरे हिंगणघाट
ब्रिलियन्ट स्कूल हिंगणघाट येथे उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले. आयोजित कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मातोश्री आशाताई कुणावार महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उमेश तुळसकर व विद्या विकास महाविद्यालयाच्या उप प्राचार्य डॉ.नयना शिरभाते या लाभल्या. प्रमुख अतिथी म्हणून दिपाली दिक्षित, रेणुका दानव , ममता काकडे, विठ्ठल दानव ,संगीता गडवार , अरविंद दहापुते , गौरी हुलके ,ममता माकडे,रेखा मसराम यांची उपस्थिती लाभली. याप्रसंगी डॉ.नयना शिरभाते यांनी उन्हाळी शिबिराचे महत्त्व सांगितले. तर दिपाली दिक्षित यांनी मुलांवर बालसंस्कार कसे करायचे हे आपल्या विचारातून व्यक्त केले.तसेच विठ्ठल दानव व रेणुका दानव यांनी संगीताचे महत्त्व पटवून दिले.तसेच संगीता गडवार यांनी भरतनाट्यमचे प्रशिक्षण दिले.तसेच ममता माकडे व रेखा मसराम यांनी योगाचे प्रशिक्षण दिले. प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सविता साटोने यांनी केले व संचालन नीता उराडे यांनी केले. आभार कल्याणी झिलपे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीेतेसाठी शिक्षिका वंदना राऊत, राणी गलांडे, ऋतुजा पतंगे,सोनल काळे, उज्वला सातपुते, प्रतिभा लाजूरकर, पायल खोडे यांचे सहकार्य लाभले.