हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या युवकाला अटक

क्राइम

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर.

बल्लारपूर : शहरात हातात तलवार घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या युवकाला रात्री १२ – १२.३० वाजताच्या सुमारास बल्लारपूर पोलिसांनी अटक केले.येथील गौरक्षण वार्ड लालबोडी येथील युवक राहुल हनुमंत तनेरा (२२) हा हातात तलवार घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत होता. त्याची माहिती पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक गोविंद चाटे सह पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन कोबिंग ऑपरेशन करून राहुल हनुमंत तनेरा या युवकाला तलवार सहित अटक केले. त्याच्यावर शस्त्र अधिनियम अन्वये कारवाई करून बल्लारपूर पोलीस स्टेशन अप. क्र.२७५ कलम ४,२५ शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले.सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख, पोलीस उपनिरीक्षक गोविंद चाटे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन डोईफोडे, पोह बाबा नैताम, प्रणय, सौरभ, शेखर यांनी केले.

CLICK TO SHARE