शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे वसमत येथील संवाद सभेत वक्तव्य

अन्य

प्रतिनिधी :अशोक इंगोले हिंगोली

हिंगोली जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता , आहे व राहणार आहे आमचा मतदारावर विश्वास आहे..1996 च्या शिवसेनेच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून हिंगोली व परभणी हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला 1996 ला पहिलाच निवडणुकीत शिवसेनेचा येथे खासदार निवडून आला परंतु हिंगोली व परभणीला आमदार व खासदारांच्या पक्ष फुटीचे ग्रहण लागले परंतु मतदार राजा हा शिवसेनेचा कायम राहिला जे पक्ष सोडून गेले त्यांना पुन्हा विजयाचा गुलाल कधीच लागलेला नाही लागणार नाही कारण खासदार व आमदारांनी शिवसेना सोडली असली तरीही मतदार रिझल्ट हा शिवसेनेचा कायम राहिला आहे हेच शिवसेनेचे खरे प्रेम आहे असे वक्तव्य शिवसेनेचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वसमत येथील कुटुंब संवाद कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले वसमत येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालय आज शिवसेनेच्या वतीने पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुटुंब संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे खासदार संजय राऊत परभणीचे खासदार बंधु जाधव माझे सहकार मंत्री जयप्रकाश मुंदडा माजी आ नागेश पाटील आष्टीकर माजी खासदार सुभाष वानखेडे शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात जिल्हा प्रमुख विनायक भिसे सह संपर्कप्रमुख सुनील काळे डॉक्टर कन्हैया बाहेती यांच्यासह शिवसेना पदाधिकारी यांची व्यासपीठावर उपस्थित होती यावेळी शिवसैनिकांची संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर प्रहार केला पक्षासोबत फोटो ही चोरणारेहे निर्लज्ज सरकार असल्याचे सांगून शेतकऱ्याला पीक विमा आपत्कालीन मदत न देता मोदी की गॅरंटी अशा घोषणा देत आहेत सरकारी यंत्रणा बाजूला सारून निवडणुका घेऊन दाखवा तुम्हाला तुमची जागा कळेल असेही उद्धव ठाकरे म्हणाले आम्ही देशभक्त आहोत पण मोदी भक्त नाही अनेक मुस्लिम बांधवही देशभक्त आहेत आणि सत्तेचे भुकेले नाहीत आम्ही जनतेची सेवा करणारे सेवक आहोत तेव्हा आम्हाला लुबाळून राज्य करू नका भाजपाने कमळ निवडणूक चिन्ह ऐवजी हा तोडा चिन्ह घ्या अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर पलट वार केला आपकी बारिक भाजप तडीपार अशी घोषणा ही त्यांनी यावेळी दिली शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलण्याऐवजी भाजपाचे नेते समाजात भांडणे लावण्याचे काम करतात सत्ताधार्याकडून हे चालू आहे यंत्रणा वापरून खरडण्या गोळ्या करणाऱ्या भाजप व गद्दारांनी सरकार यंत्रणा बाजूला ठेवून निवडणुका घ्याव्यात असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले खासदार अशोकराव चव्हाण यांच्यावर त्यांनी क** शब्दात टीका केली यावेळी खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर कडक शब्दात प्रहार केला शिवसेनेला ज्यांनी सोडले ते आता मावळे राहिलेले नाहीत कावळे झाले आहेत त्यांना लोकसभा निवडणुकीत चारी मुंड्या चित करा सध्याचे भाजपा सरकार इडी सिबीआयचा धाक दाखवून पक्ष फोडत आहेत या नंतर सत्ता आमच्या हाती येणारच आहे तेव्हा तुम्ही पक्ष शिल्लक राहतो का पहा असेही वक्तव्य संजय राऊत यांनी यावेळी केले जनता दूध खुळी नाही ती तुम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही असा घनाघातही संजय राऊत यांनी भाजपावर यावेळी केला ज्यांच्यावर भावाप्रमाणे प्रेम केले त्यांनी पाठीत खंजीर खूपच ला या अशांना पुन्हा दिल्ली दाखवायचे नाही असा निर्धार करण्याच्या आवाहनही संजय राऊत यांनी यावेळी केले.विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांचा शेतीमालाला दहा वर्षे पूर्वीचा भाव आहे मात्र बी बियाण्यांचे भाव पाच दहा पट वाढले असल्याचे सांगून दुष्काळाचा गारपीटी चा लाभ देखील शेतकऱ्यांना मिळाला नसून हे सरकार जनतेसाठी काम करते का पक्षासाठी असा संभ्रम निर्माण झाल्याचेही सांगितले माजी सरकार मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी आपल्या भाषणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचे आभार मानले व सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी उद्धव साहेबांनी वेळ द्यावा असे आवाहनही आपल्या भाषणात केले माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आपल्या भाषणात हिंगोली लोकसभा निवडणुकीत साहेब यांना शिवसेनेचे तिकीट देतील त्यांना आम्ही सर्वजण एकत्र येऊन मोठ्या बहुमताने निवडून आणू असा विश्वासही ठाकरे यांनी दिला जे उद्धव ठाकरे यांचे झाले नाहीत ते आयुष्यात कोणाचेच होणार नाहीत असे सांगून उद्धव ठाकरे यांच्या कोविड काळातील व शेतकऱ्यांच्यासाठी त्यांनी केलेल्या कामाचे गौरव नागेश पाटील आष्टीकर यांनी आपल्या भाषणात केला या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन रामू चव्हाण यांनी केले तर डॉक्टर अजय प्रकाश मुंदडा यांनी आभार मानले या कार्यक्रमासाठी शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी तन-मन-धनाने काम केले परंतु काही जण फक्त स्टेजवरच गर्दी करताना दिसते या कुटुंब समाज सभेला तुलनेने गर्दी कमी होती संपूर्ण मंगल कार्यालय ही कार्यकर्त्यांनी भरवले नव्हते.

CLICK TO SHARE