शेंदुरजना घाट केदारेश्वर मंदिरात श्री साई पारायण व महाप्रसादाचे आयोजन

अन्य

प्रतिनिधी:रवि वाहने शेंदुरजना घाट(अम)

येथे गेल्या सात वर्षा पासून साई पारायण व महाप्रसाद कार्यक्रम याहीवर्षी श्री सदगुरु साई भिक्षा झोली पालखी पदयात्री समिती पांढुर्णा मध्यप्रदेश व श्री साई पदयात्री व साई सायकल यात्री शेंदुरजनाघाट यांच्या संयुक्त सहकार्याने श्री.एन.जी. मोघे सभागृह के दारेश्वर मंदिर येथे २१ मार्चला एक दिवसीय श्री साई पारायण व महाप्रसादकार्यक्रम आयोजित केला आहे.या श्री साई पारायणाकरीता २० मार्चला मारोती मंदिर, मलकापूर येथील साईबाबा मंदिरातून साईबाबांच्या चरण पादुकाची पालखीत मिरवणुक निघाली. २१ मार्चला पहाटे ५.३० वाजत चरण पादुकांचे मंगलस्नान व काकडा आरती नंतर पारायणाला सुरवात होईल. सांयकाळी ६ वाजता पारायण समाप्ती व धुप आरती झाल्यानंतर महाप्रसाद वितरणाला सुरवात होईल. त्यानंतर रात्री १० वाजता आरती होणार आहे. श्री साई पारायणासह महाप्रसादाचा सर्वानी लाभ घ्यावा,साई पालकी चे अयोजक विकी जैस्वाल,संजय थेटे,प्रीतम नथीले,अजय टाकरखेडे संजय जैस्वाल,कपिल सरोदे समस्त साई परिवार शेंदुरजना घाट

CLICK TO SHARE