होळीला राजकीय रंग विशेष खबरदारी घ्या कडक बंदोबस्ताच्या पोलिस निरीक्षक च्या सूचना

अन्य

तालुका प्रतिनिधि अजय दोनोडे आमगांव

राजकीय बिगुल वाजल्याने होळीच्या निमित्ताने विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना आमगांव तालुका पोलिस निरीक्षक युवराज हाडे यांनी पोलिस दलाला दिल्या आहेत. शहरात कुठेही अनुचित घटना घडू नये, यासाठी कडक बंदोबस्त आणि उपाययोजनांची आखणी करण्यास सुरुवात केली आहे. शहरामध्ये होळी, धूलिवंदन आणि शनिवारी रंगपंचमी, असे सण पारंपरिक पद्धतीने साजरे करण्यात येणार आहेत. पोलिस यांनी केलेल्या सूचनांनुसार, होळी, धूलिवंदन उत्सवादरम्यान महिलांच्या अंगावर रंग, पाणी फेकणे, त्यांची छेडछाड, विनयभंग करणे, असे प्रकार घडण्याची शक्यता आहे. पादचारी, वाहनचालकांवर रंगाचे फुगे मारल्याने होणारे अपघात, मर्यादेपेक्षा आवाजात ध्वनिक्षेपकांचा अमर्याद वापर, गाण्यांच्या तालावर नृत्य, धार्मिक वाद, रंग उधळणे, पोलिसांशी हुज्जत घालणे, होळीसाठी लाकडे चोरून नेणे, आदी कारणांमुळे कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याचीशक्यता आहे *धार्मिक भावना दुखवू नका* धार्मिक भावना दुखविण्यासारख्या चित्रफिती व ध्वनिफिती सादरीकरण किंवा प्रसारित होणार नाहीत, याची विशेष खबरदारी घ्यावी. सार्वजनिक किंवा मोठ्या स्वरूपाच्या होळ्या पेटविण्याचे ठिकाणी गर्दीचे योग्य व्यवस्थापन करणे, गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष ठेवून मारामारी, इतर कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घ्यावी. धूलिवंदन व रंगपंचमीच्या वेळी परंपरेने चालू आलेल्या प्रथेनुसार काही लोक भांगमिश्रित दूध प्राशन करतात. यादिवशी दूधभेसळीचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे सतर्क राहा, असेही आवाहन युवराज हाठे यांनी केले आहे

CLICK TO SHARE