अटल भूजल योजना, अमरावती अंतर्गत झटामझिरी येथे जागतिक जल दिन साजरा

अन्य

प्रतिनिधी:रवी वाहाने शेंदुरजना घाट

दिनांक 22/03/2024 रोजी वरूड तालुक्यातील ग्रामपंचायत झटामझीरी येथे मा. वरिष्ठ भूवैज्ञानिक, भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक जल दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत झटामझिरी येथे जल प्रतिज्ञा घेवून पाणि वाचविण्याचा संकल्प घेण्यात आला. पाणी बचत काळाची गरज, व “जल ही जीवन” या विषयावर मा. सरपंच हिराकांतजी उईके यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदवीला. पाणी हे जीवन व पाण्याविना ही सृष्टी विचार करणे हे सुद्धा गंभीर दृश्य महत्वाचे या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. पाणी या विषयावर काम करत असतांना कोणती आव्हाने येतात व त्यावर उपाययोजना कश्याप्रकारे केल्या जातात या विषयी चर्चा केली. तसेच योजना राबण्यासाठी लोकसहभाग कीती महत्वाचा या विषयी सविस्तर सांगण्यात आले. व शेवटी जल प्रतिज्ञा घेवून पाणि वाचविण्याचा संकल्प घेण्यात आला व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग कसा घेवू शकता या विषयी जिल्हा अंमलबजावणी भागीदार संस्था चे समन्वयक शरद गोरे यांनी मार्गदर्शन केले, व माहिती शिक्षण संवाद तज्ञ कमलेश अजमीरे व समूह संघटक भूषण कोहळे, गजानन सलामे, ग्रामपंचायतचे अधिकारी पदाधिकारी व कर्मचारी तसेच गावातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका कृषी सखी, बँक सखी भूजल मित्र , शाळेतील मुख्याध्यापिका, शिक्षक वृंद व कर्मचारी या जलसप्ताह जलप्रतिज्ञेच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.

CLICK TO SHARE