वडनेर जवळ झालेल्या एका टिप्पर चा भीषण विचित्र अपघातात तीन जण जागीच ठार तर दोन गंभीर जखमी

अन्य

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

अपघातातील जखमींच्या
मदतीसाठी थांबलेल्या कारला टिप्परने धडक दिल्याने झालेल्या विचीत्र अपघातात तीघांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना येरणगांव येथे घडली. विजय देवतळे (वय४५), अक्षय कोलकडे(वय२५) दोन्ही रा. येरणगांव व राहुल नैताम(वय२७) रा. अलमडोह अशी अपघातातील मृतकांची नावे आहेत तर याच अपघातात रतन पचारे रा. कात्री व अर्जुन मोरे(वय३५) हे गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वडनेर ते सिरसगांव रस्त्यावर असलेल्या सुरकार यांच्या शेताजवळ एक टिप्पर सकाळपासूनच नादुरुस्त अवस्थेत उभा होता. दरम्यान मागाहून भरधाव आलेल्या दुचाकी चालकास टिप्पर दिसला नाही आणि त्याची दुचाकी टिप्परवर धडकली. यामध्ये दुचाकीस्वार हा जखमी झाला. यावेळी सिरसगांवकडून एमएच ३२ एएस ४८३७ क्रमांकाची कार जखमीच्या मदतीसाठी तेथे थांबली. त्या कारमधून काही जण खाली उतरलेत आणि जखमी दुचाकीस्वाराच्या मदतीला धावले. यावेळी जखमी दुचाकी चालकास कारमध्ये बसवत असतानाच वडनेरकडून भरधाव येणाऱ्या रेतीच्या एमएच ३१ एफसी ०४३४ क्रमांकाच्या टिप्परचालकाने आपले वाहन निष्काळजीपणे चालवून त्या कारला चिरडले. या अपघातात तीघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ वडनेर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी अधिक तपास वडणेर पोलीस करीत आहे
CLICK TO SHARE