जुनोना जंगलात फायर टाॅवर कापताना एका आरोपीला अटक

क्राइम

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपुर : जुनोना तिघे जण झाले पसार जंगलात फायर टॉवर गॅस कटर ने कापताना एका आरोपीला बल्लारपूर पोलिसांनी अटक केली असून तीन आरोपी फरार आहे.बल्लारपूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांना गुप्त माहिती मिळाली की जुनोना चा जंगलात काही इसम फायर टॉवर गॅस कटर ने कापत आहे. त्यावरून पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांनी आपल्या पथक सहित जुनोना जंगलात गेले. पोलिसांना बघून तीन आरोपी पळून गेले तर एका आरोपीचे मुसक्या आवळल्या. आरोपी सागर विलास शेरकी वय ३५ वर्ष रा. मोरवा, चंद्रपूर याला अटक केले. तर ट्रॅक्टर मालक गुड्डू मेश्राम रा. जनता महाविद्यालय जवळ चंद्रपूर कंसु आरोपी पळून गेले.आरोपी कडुन गॅस सिलिंडर, गॅस कटर सिलिंडर व अन्य साहित्य सहित ट्रॅक्टर जप्त केले.सदर कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आसिफराजा शेख‌, सहायक पोलिस निरीक्षक काॅंक्रिटवार, सहायक पोलिस निरीक्षक पांडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक गजानन डोईफोडे, बाबा नैताम, कैलास आदे, मिलिंद आत्राम, कैलास चिंचोलकर, परमवीर यादव तसेच एफडिसिएम जुनोना वनपरिक्षेत्र अधिकारी मेश्राम तसेच बल्लारपुर पोलिस व एफडिसिएम जुनोना चे पथक ने केली.

CLICK TO SHARE