महात्मा गांधी आयुर्वेदिक महाविद्यालयतून सालोडची कु.साक्षी कृष्णाजी मुते प्रथम

एज्युकेशन

प्रतिनिधी: अरबाज पठाण ( वर्धा )

महात्मा गांधी आयुर्वेदिक रुग्णालय महाविद्यालय व अनुसंधान केंद्र सालोड (हि.), वर्धा येथील विध्यार्थीनी कु. साक्षी कृष्णाजी मुते हिने बी. ए. एम. एस. चतुर्थ अंतिम वर्षाच्या परीक्षेत 1100 पैकी 895 गुण म्हणजेच 81.37 टक्के गुण घेत विद्यापीठातून प्रथम क्रमांक पटकविला. तिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, दत्ता मेघे शिक्षण संशोधन संस्था सावंगी (मेघे) चे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ.अभ्युदय मेघे, प्राचार्य डॉ. वैशाली कुचेवार, उपप्राचार्य डॉ. गौरव सावरकर, डॉ. प्रज्ञा दांडेकर, डॉ. अनिता वंजारी, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापकवृंद – कर्मचारीवृंद यांना दिले. तिच्या यशाबद्दल सालोड (हि.) चे सरपंच अमोल कन्नाके व गावकऱ्यांनी अभिनंदन केले.

CLICK TO SHARE