१०७ परवानाधारक शस्त्र पोलीस स्टेशन मध्ये जमा

क्राइम

जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर

बल्लारपूर पोलीस स्टेशन अंतर्गत तब्बल १०७ जणांनी परवानाधारक शस्त्र घेतले आहे. हे शस्त्र घेणाऱ्यांमध्ये राजकीय पदाधिकारी, व्यावसायिक आणि एका पत्रकारांचा समावेश आहे. सध्या लोकसभा निवडणुकीचा पार्श्वभूमीवर निवडणूक आचारसंहिता असल्याने हे शस्त्र पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.परवानाधारक शस्त्र घेण्यासाठी विहित नमुन्यात प्रशासनाकडे अर्ज करावा लागतो. अर्जदाराने या अर्जातील सर्व पूर्तता पूर्ण केल्यानंतर पडताळणी होते. शस्त्र कोणत्या कारणासाठी हवे आहे? हे स्पष्ट करावे लागते. यानंतर अर्जदाराला शस्त्राचा परवाना दिला जातो. हे खर्चिक काम आहे.स्वसंरक्षणासाठी हे शस्त्र घेतले जाते. शस्त्रासोबत असलेल्या काडतुसांचा हिशोबही त्यांना पोलीसांना द्यावा लागतो. सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. या काळात शस्त्र पोलिस ठाण्यात जमा करावे लागत आहेत. बल्लारपूर पोलीस स्टेशन अंतर्गत १०७ शस्त्र परवानाधारक असून त्यामधील १० लोकांनी शेतीच्या सुरक्षा साठी घेतले आहे. त्यात विसापुर, जुनोना, इटोली, मानोरा, कोटी मक्ता, केम तुकूम, बामणी या गावात १० जणा जवळ शस्त्र परवाना आहे. या शस्त्रात पिस्तूल, रिव्हॉल्व्हर, १२ बोर भरमार बंदूक जमा करण्यात आले आहे.

CLICK TO SHARE