मातृवृक्ष बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्था द्वारा विश्व जलदिनानिमित्त निबंध स्पर्धा व पारितोषिक वितरण संपन्न

एज्युकेशन

प्रतिनिधी :आसिफ मलनस (हिंगणघाट )

हिंगणघाट /दि 30/03/2024मातृवृक्ष शैक्षणिक व सामाजिक संस्था आणि जी बी एम एम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांचे वतीने दिनांक 22/3/2024 रोजी जागतिक जल दिन व वन दिन साजरा करण्यात आला. या निमित्य विद्यार्थांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. निबंध स्पर्धेचे विषय पूर्व माध्यमिक विद्यार्थ्यांना…जल हेच जीवन …… व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना ‘ जल सुरक्षा – जवाबदारी व समृद्ध भविष्य ‘ हे होते. स्पर्धेत 175 विद्यार्थी सहभागी झाले होते. निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण दिनांक 30/03/ 2024 ला स्थानीय जी बी एम एम हायस्कूल मध्ये करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मातृवृक्ष संस्थेचे सचिव श्री किशोर उकेकर हे होते. तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जी बी एम एम हायस्कूलचे उपमुख्याध्यापक श्री एम एस कुरेशी तसेच पर्यवेक्षक श्री तराळे सर तसेच ज्येष्ठ शिक्षिका राऊत मॅडम व मातृवृक्ष संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अनिस बेग व्यासपीठावर उपस्थित होते. निबंध स्पर्धेमध्ये वर्ग ५ ते ८ मधून प्रथम पुरस्कार प्रज्वल भालचंद्र हेडाऊ ८ क तर द्वितीय पुरस्कार वनश्री निलेश जीवने ८ क व तृतीय पुरस्कार जिनत हमरा वहाब खान पठाण ८ क यांनी पटकावला प्रोत्साहन पुरस्कार कनक महेंद्र कटारे वर्ग ६ क व संयम सेवक दास जारुंडे वर्ग ८ क या विद्यार्थ्यांनी मिळविला. वर्ग ९ व ११ मध्ये प्रथम पुरस्कार श्रद्धा एस तिवारी व द्वितीय पुरस्कार योगेश्वरी हेमंत डेकाटे आणि तृतीय पुरस्कार अक्षरा ताराचंद खंडाले या विद्यार्थिनींनी मिळविला. प्रोत्साहन पुरस्कार कशिश यादव व शमाबानू शमशुल हक यांना मिळाला. कार्यक्रमाचे संचालन श्री त्रिरत्न नागदेवे यांनी केले प्रास्ताविक मातृवृक्ष संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.अनिस बेग यांनी मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मातृवृक्ष बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी व जी बी एम एम हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे सौ दांडेकर सौ ठाकरे सौ नियाझी व सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी मोलाचे परिश्रम केले. असेच शैक्षणिक कार्यक्रम भविष्यात व्हावे असे विद्यार्थी व पालकांनी आपले अभिप्राय मांडले.

CLICK TO SHARE