शरद पवार यांच्या उपस्थितीत अमर काळे यांचा पक्ष प्रवेश,अखेर उमेदवारीवर शिक्कमोर्तब

चुनाव

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांच्या नावावर पक्ष प्रवेशानंतर शिक्कामोर्तब झाले असल्याची बाब स्पष्ट झाली आहे.ते राष्ट्रवादी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार आहेत. सायंकाळी पवार यांच्या मुंबई सिल्वर ओक या बंगल्यावर काळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी संस्थापक अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी आमदार प्रा, सुरेश देशमुख, प्रा.राजू तिमांडे, कृउबा हिंगणघाटचे सभापती अॅड. सुधीर कोठारी, अतुल वांदिले, किशोर माथानकर, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत हे नेते प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी नाराज नेत्यांशी प्रथम चर्चा झाली. त्यांची नाराजी दूर करण्यात आल्यानंतर काळे यांना बोलावून घेण्यात आले. सर्वांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा झाला. त्यामुळे अमर काळे हेच आता आघाडीचे उमेदवार राहणार यात तिळमात्र शंका नाही.

CLICK TO SHARE