अमर काळे यांच्या प्रचारार्थ सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन

चुनाव

अमर काळे यांच्या प्रचारार्थ सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन,भाच्याच्या विजयाची जबाबदारी मामाच्या खांद्यावर २ एप्रिल ला भव्य नामांकन रॅलीशरद पवार राहतील उपस्थीत

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

वर्धा लोकसभा निवडणुकी करिता महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाला विदर्भातून एकमेव जागा मिळाली.पक्षाची विदर्भाची जबाबदारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खांद्यावर अनेक वर्षापासून आहे. राष्ट्रवादी पक्षाला वर्धा मतदार संघात सर्वसमावेशक उमेदवार मिळत नव्हता. तेव्हा अनिल देशमुखांनी आपल्या सख्ख्या भाच्याला म्हणजेच अमर काळे यांना उमेदवार म्हणून निवडण्यात यश आले.मामा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याने माजी आमदार अमर काळे यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याची तयारी दर्शवली. सुरुवातीला काँग्रेसकडून ही जागा सुटली पाहिजे याचे प्रयत्न झाले. परंतु नंतर त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश घेतला. अनिल देशमुख त्यांच्याकरिता वर्धा मतदार संघाची जागा प्रतिष्ठेची आहे. त्यामुळेच अमर काळे यांना खासदार करण्याची जबाबदारीआता खुद्द मामांच्या खांद्यावर आली आहे.त्यासाठीच आज वर्धा येथे इंडिया अलायन्सची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला माजी मंत्री अनिल देशमुख व आघाडीच्या इतर पक्षातील नेते एकत्र आले आहेत. अमर काळे यांच्या आईचा स्मृती दिवस दोन एप्रिल रोजी आहे. या स्मृतीदिवशी आदरांजली वाहत महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व सर्व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थित स्वाध्याय मंदिर येथून रॅली काढत काळे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

CLICK TO SHARE