भाजपा निवडणूक प्रसार कार्यालय चे उद्घाटन वसंत काका खेडेकर यांच्या हस्ते

चुनाव

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर.

बल्लारपूर : चंद्रपूर- वणी- आर्णी लोकसभाक्षेत्रातून भाजपा चे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचार कार्यालय चे उद्घाटन येथील बस स्टँड जवळील वेंकटेश एम्पोरियम कॉम्प्लेक्स येथे काल ३१ मार्च रोजी झाला.या वेळी भाजपा चे वरिष्ठ नेते चंदन सिंह चंदेल, भाजपा शहर अध्यक्ष काशीनाथ सिंह, आर.पी. आय (कवाडे) चे जिल्हा अध्यक्ष हरिशभाई दुर्योधन, शिव सेना ( शिंदे गट) चे कमलेश शुक्ला, भाजयुमो चे आशिष देवतळे, भाजपा महिला मोर्चा चे रेणुका दुधे यांनी मार्गदर्शन केले.मंचावर भाजपा ज्येष्ठ नेते चंदन सिंह चंदेल, भाजपा जिल्हा अध्यक्ष (ग्रामीण) हरीश शर्मा, भाजपा शहर अध्यक्ष काशीनाथ सिंह, वरिष्ठ नेते निलेश खरबडे, समीर केणे, सतविंदर सिंह दारी, भाजपा शहर महासचिव मनिष पांडे, शिवचंद त्रिवेदी सह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यालयाचे उद्घाटन भाजपा चे उपस्थित मान्यवर सहीत जेष्ठ पत्रकार वसंत काका खेडेकर यांचे हस्ते झाले.या वेळी भाजपा शहर सचिव सतीश कनकम यांच्या नेतृत्वात चंदन राजपूत सहित ५० लोकांनी भाजपा मध्ये प्रवेश केले.त्यांना चंदन सिंह चंदेल यांचे हस्ते दुपट्टा देउन त्यांचे स्वागत केले.संचालन भाजपा शहर महासचिव मनिष पांडे यांनी केले.

CLICK TO SHARE