विसापूर येथे अज्ञात इसमाने रेल्वे रुळावर झोपुन आत्महत्या केल्याची घटना

अन्य

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : तालुक्यातील विसापुर येथे अज्ञात इसमाने रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.२ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास विसापुर जवळ अज्ञात इसमाने रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या केली आहे. त्याचे कमरेपासून दोन भाग झाले आहे. सदर युवकाचे अंदाजे २५- ३० वर्ष असून त्याची उंची अंदाजे ५.४ फूट आहे. सदर इसमाची ओळख पटली नसून त्याचे शव ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे ठेवण्यात आले. सदर इसमास कोणी ओळखत असेल त्यांनी बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण तळी करीत आहेत.

CLICK TO SHARE