संसदेत गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे जातीने प्रश्न मांडणारा उच्च विद्या विभूषितच खासदार हवा

चुनाव

मौनी बाबा तथा निष्क्रिय खासदाराला निरोप देण्याची आता वेळ

तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगांव एक सुजाण व सज्ञान गडचिरोलीकर मतदाराचे मतगेली 10 वर्षे भाजपने गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्रात जो अशोक नेते यांच्या रूपाने उमेदवार दिला. त्यांना केवळ मोदी यांच्या नावाने क्षेत्रातील मतदारांनी भरघोस प्रतिसाद मताधिक्याने निवडून दिले. अशोक नेते हे केंद्रातील सरकार कडून भरघोस निधी आणून क्षेत्राचा विकास साधणार अशी सर्वांगी अपेक्षा व्यक्त होत होती. माञ जनतेच्या समस्या, मूलभूत प्रश्न यांची तिळमात्र हि जाण न ठेवणाऱ्या खासदार अशोक नेते यांनी सम्पूर्ण क्षेत्रातील मतदारांचा भ्रमनिरास केला.केवळ 10 वर्षे सत्तेच्या मदमस्तीत स्वतःचा विकास साधणारे खासदार अशोक नेते हे जनतेच्या नजरेत सपेशल अपयशी ठरले आहे. त्यामुळेच सध्याचा 2024 च्या लोकसभा निवडणूकीचे बिगुल वाजले तेव्हा भाजपाच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव नव्हते. याबद्दल अधिक करणीमासा जाणून घेतली असता यामागे निराळेच कारण पुढें आले.ते असे की,भाजप करवी करण्यात आलेल्या सर्वे मध्ये अशोक नेते हे जनतेच्या नजरेत सपेशल अपयशी ठरले. आणि सतत 10 वर्षे खासदारकी ची जबाबदारी असताना त्यांनी पक्ष संघटन, कार्यकर्ता भेट, जनतेशी संवाद, किंव्हा मतदार समस्या, मूलभूत प्रश्न हे जाणून घेण्यासाठी साध्या गावोगावी फिरून भेटी सुद्धा दिल्या नाहीत. यामुळे त्यांचा पराभव निश्चित आहे. हे गृहीत धरून भाजपने दुसऱ्या उमेदवाराचा शोध घेणे सुरु केले. अश्यातच लोकसभा निवडणुकीचे नामांकन दाखल करण्यास सुरुवात झाली. यात इंडिया अलायांस तथा महाविकास आघाडी व घटक पक्षाचे गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांनी गेल्या 5 वर्षापासून क्षेत्रातील प्रत्येक गावात भेटी देऊन पक्ष संघटन कार्यकर्ता संवाद साधून आपल्या कार्याची छाप सोडली व त्यांना राज्यांचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार तथा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची मिळालेली योग्य साथ यामुळे अगोदरच त्यांना उमेदवारी प्राप्त झाली. आणि नामांकन दाखल करण्यास सुरुवात होताच डॉ. नामदेव किरसान यांचे नामांकन दाखल करते वेळी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,उमेदवार डॉ नामदेव किरसान व गडचिरोली काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांचे नेतृत्वात लोकसभा क्षेत्रातील 15 हजार कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.आणि विजयाचा शंखनाद त्याच वेळी अनुभवला गेला. एकीकडे अबकी बार 400 पार असा नारा भाजपा कडून देण्यात येतं असला तरी माञ अनेक ठिकाणी भाजपला उमेदवार सापडेना अशी परिस्थिती निर्माण झाल्याने विवीध पक्षातून उमेदवारांची आयात भाजप मध्ये सुरु आहे. भाजपा हा देशातील नागरिकांचा पसंतीचा पहिला पक्ष असा डंका केवळ भाजपवालेच पिटतात. माञ खरी हकीकत जाणून घेतल्यास भाजप कडून बहुजन मतांचे विभाजन, पक्ष फोडाफोडीचे राजकारण, इडी, सीबीआय, इन्कम टॅक्स आदी संस्थेचा गैरवापर असे विवीध हतकांडे वापरून विरोधकांना शमावून सत्तेत येण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशात प्रत्येक नागरिकांना समान हक्क, अधिकार मिळावा यासाठी सर्व समावेशक घटनांची तरतूद असलेले संविधान दिले. माञ भाजप सारख्या मनुस्मृति विचारांचे लोकांनी देशातली संविधान व लोकशाही समूळ नष्ट करण्याच्या घाट रचला असुन केवळ हिंदू राष्ट्र नाव घेऊन धर्मांधता पसरविणे सुरु केले आहे. या विघातक प्रवृत्तीमुळे देशांत जातीय तेढ निर्माण होउन देशाच्या सार्वभौमत्व व एकात्मतेला धोका संभविण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अश्यातच आपण जागरूक मतदार म्हणुन मनुस्मृति वाद्यांना विरोध न केल्यास देश पुन्हा गुलामगिरीच्या खाईत लोटल्या जाईल. आता 2024 ची देशाची हि निवडणुक अंतीम समजल्या जात आहे.तर संसदेत हु शब्द न काढणाऱ्या मौनी बाबा खासदार अशोक नेते यांना उत्कृष्ट संसद पटू अश्या पुरस्काराने सन्मानित केले जाते. हि फार मोठी हास्यास्पद बाब असून संसदेत न बोलणाऱ्यांना सन्मान व प्रश्न उपस्थीत करणाऱ्यांना निलंबन अशी दुटप्पी भूमिका केंद्र सरकारने आजवर घेतली आहे. व्यापारी हित जोपासून देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे करणारे व विश्वगुरू म्हणुन स्वतःची पाठ थोपटून घेणारे यांनी देशातली मीडिया वर बंधने घालून देशातली नागरीकांना दिशाहीन चित्र दाखविण्याचे काम सुरू केले आहे. देशातील रोजगार, महागाई, रुपयाची घसरण, जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमती, गरिबांचे शोषण, शेतकऱ्यांचे हमीभाव अभावी होणारे हाल, खाजगीकरण या ज्वलंत समस्या मूलभूत गरजा व ईतर बाबींकडे पाठ फिरवून केवळ हिंदू राष्ट्र, राम मंदिर, धर्म, वर्ण, जाती आदींच्या राजकारणात गुंतवून देशाच्या स्वातंत्र्याचे धिंडवडे काढने सुरु केले आहे. आता जागरूक होण्याची वेळ आली आहे मित्रांनो आगामी निवडणुकांमध्ये हे जुमलेबाज भाजप वाले पुन्हा काही नवीन घेऊन येतील मात्र आपण जागरूक मतदार म्हणुन सावध पवित्रा घेत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत संसदेत गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार निवडतांना निष्क्रिय , कमी शिक्षीत व जनतेच्या समस्या, मूलभूत गरजा व प्रश्नांना थारा न देणाऱ्या उमेदवाराला पराभवाची वाट दाखवून इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान या उच्च शिक्षित विद्या विभूषित उमेदवाराला संसदेत पाठवून आपल्या क्षेत्राचा विकास करण्यासाठी, लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी अमूल्य मत देऊन प्रचंड मताधिक्याने निवडून दिले पाहिजे.

CLICK TO SHARE