गरिबांच्या वस्तीत छोटा तलाव येथे रोजा इफ्तार आयोजन करणारे एकमेव आमदार राजू भैय्या नवघरे

अन्य

प्रतिनिधी : अशोक इंगोले ( हिंगोली)

हिंगोली : वसमतगेल्या अनेक वर्षांपासून पवित्र रमजान महिन्याचा रोजा इफ्तार पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आयोजित करत असतात.तालुक्यात व शहरात अनेक ठिकाणी रोजा इफ्तार पार्टीत आमदार राजू भैय्या नवघरे यांनी आवर्जून उपस्थिती लावली.प्रत्येक समाजाचे सना चा आदर करणे माझ कर्तव्य म्हणून विविध ठिकाणी असे स्पष्ट मत आमदारांनी व्यक्त केलं. परंतु छोटा तलाव हे गरिबांची कष्टकरू,बांधकाम गुत्तेदार,मिस्त्री,लेबर, नागरिक असणाऱ्या वस्तीत आमदार राजू भैय्या नवघरे यांनी स्वतः मुस्लिम समाजाचा आदर म्हणून इफ्तार पार्टी आयोजन केली.त्यामध्ये उपवास ठेवणारे असंख्य नागरिकांचा सहभाग होता.त्यांच्यासाठी विविध फळ, शरबत,ठेचण्यात आले.त्यांच्या सोबत शहरातील विविध समाज बांधवानी सहभाग नोंदवला जेणेकरून सर्व धर्म एकोपाचे प्रतिक दिसून आले.इफ्तार पार्टीत आयोजनास मुजीब खान शहर अध्यक्ष,अमजद खान उर्फ नम्मू कार्याध्यक्ष,सय्यद नय्यूम,आमेर अहमद,परिसरातील असंख्य युवकांनी अतिशय परिश्रम घेतले.इफ्तार पार्टीत व्यापारी संघाचे अध्यक्ष सुभाष लालपोतु, संजय काकडे,सचिन दगडू,डॉ.सनाउल्ला खान,नगरसेवक नदीम सौदागर,अकबर अली, मजीद साऊंड,गौस बाबा,मोदी भैय्या,अफरोज खाद्री,रवी डोळसे,करिमोद्दीन शेख इतर मान्यवर उपस्थित होते.शहरातील सर्वात मोठ्या संख्येने नरिकांनी उपस्थिती लाव्यालयाबद्दल मुस्लिम व सर्व समाजाचे आमदार राजू भैय्या नवघरे यांनी आभार मानले.गरिबांचा कैवारी सर्व समाजाच्या सणाचा आदर करणारा नेता आमदार राजू भैय्या नवघरे म्हणून नागरिकांत चर्चा आहे.

CLICK TO SHARE