विसापुरातील दोन उमेदवारांची लोकशाही सदृढ करण्याची अशीही धडपड

चुनाव

दोनदा डिपाॅझिट जप्त होवूनही लढण्यासाठी सज्ज

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या विसापूर गावातुन चंद्रपूर लोकसभा मतदार संघासाठी संजय गावंडे व नामदेव माणिकराव शेडमाके हे दोन उमेदवार रिंगणात आहेत . दोघांनाही सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करण्याची आवड आहे .व यापुर्वी त्यांचा सतत दोनदा दारुण पराभव होवुन डिपाॅझिट जप्त झाली आहे.तरीही तिसऱ्यांदा ते नव उत्साहाने लोकसभा निवडणूक लढण्यासाठी सज्ज आहेत.एका छोट्याशा गावातुन लोकशाही सुदृढ करण्यासाठी व वंचित शोषीत,पिडीताचा आवाज बुलंद करण्यासाठी लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उभे आहोत, असे मत त्यांनी व्यक्त केले.संजय निलकंठ गावंडे यापूर्वी लोकसभेसाठी २००९ व २०१४ साठी उभे होते आणि आता २०२४ साठी निवडणुकीत उभे आहेत. यापूर्वी त्यांनी ग्रामपंचायत, पंचायतसमिती, जिल्हापरिषद, विधानसभा व लोकसभा लढवली आहे. त्यांच्या मते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार दिला आहे व या माध्यमातून मी स्वतःचे आर्थिक नुकसान सोसून लोकशाही जिवंत राहावी यासाठी निवडणुकीत सहभाग घेत असतो. ज्या प्रकारे कोणत्याही मैदानी खेळात एक संघ जिंकत असतो. पण त्यात अनेक संघ भाग घेतात!तेंव्हा ती स्पर्धा ठरते. त्याप्रमाणे लोकशाहीत अनेक उमेदवार लढले व त्यामधून एक विजय झाला तर खरी लोकशाही ठरणार व ती जिवंत राहणार आणि या माध्यमातून अधिकाऱ्यापासून तर सर्वसामान्य माणसापर्यंत आपले विचार पोहोचवू शकतो आणि ज्या घटकातून आलो त्या वंचित शोषित पीडितांचा आवाज बुलंद करू शकतो यासाठी निवडणुकीत उभा आहे व एक दिवस पण जिंकणार असा मला ठाम विश्वास आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्याच प्रमाणे नामदेव माणिकराव शेडमाके हे मागील २०१४, २०१९ ला लोकसभेसाठी चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून उभे होते. त्यांचा पण दोनदा पराभव होवून डिपॉझिट जप्त झाली होती. या पूर्वी त्यांनी ग्रामपंचायत जिल्हा परिषद व विधानसभा निवडणूक लढवली होती. या वर्षी २०२४ चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत ते नव्या उमदीने गोंडवाना गणतंत्र पार्टी कडून उभे आहेत. त्यांच्या मते शोषित, पीडित, वंचित व अन्यायग्रस्त जनतेचा आवाज बनून संसदेत जावे कारण धनाढ्य व विशिष्ट विचारसरणीचे उमेदवार वंचितांना न्याय देवू शकत नाही. यामुळे सर्वसामान्य परिस्थितीतून येवून सुद्धा त्यांच्यासाठी आपण काही करावे म्हणून आर्थिक नुकसान सोसून. निवडणुकीसाठी उभा आहे आणि अपयशा नंतरच यश मिळते अशी आशा असल्याने व विरोध दर्शवन्याचा हे प्रभावी माध्यम आहे असे त्यांचे ठाम विश्वास आहे म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे असे मत व्यक्त केले.ते उत्साहाने आपला स्वतःचा प्रचार करत असून त्यांना शासनाने सुरक्षा सुद्धा पुरवलेली आहे. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत विजय कोणाचाही होवो. लोकशाहीचा खरा उत्सव चंद्रपूर लोकसभेत आगामी निवडणुकीत यांच्यामुळे बघायला मिळणार आहे.

CLICK TO SHARE