रमजान: सतप्रवृत्तीची दिशा दर्शविणारा महिना

धर्म

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

संपूर्ण रमजान महिन्यात स्वतःला ‘अल्हाच्या’ सेवेत ठेवून ,नमाज, अदा करून, रोजा, जकात ,तारावीह’ चे काटेकोरपणे पालन करणाऱ्या साठी ‘ईद’ ही एक पर्वणीच आहे.इस्लाम म्हणजे ‘अल्लाह’ ला शरण जाणे, आपल्या सर्व इच्छा, मनोकामना अल्लाहच्या स्वाधीन करणे आणि त्याच्याच (अल्लाह ) हुकूमाचा गुलाम होणे होय. इस्लामची पाच मूलभूत तत्व( उसूल) आहेत. 1) प्रामाणिकपणा (इमान) 2) प्रार्थना (नमाज) 3) हज 4) रोजा आणि 5) जकात.प्रत्येक मुस्लिमाने ही पाच तत्वे अंगीकारायला हवीत.रमजानच्या महिन्यात मोहम्मदच्या प्रत्येक अनुयायासाठी स्वर्गाची (जन्नत) दारे उघडली जातात. रमजान उल मुबारक हा असा महिना आहे, ज्यात ‘कुराण ‘या पवित्र ग्रंथाची निर्मिती झाली. आयुष्यभर सर्वांना योग्य दिशा दाखविणारा कुराण आपण सारेच पवित्र मानतो. रमजानच्या महिन्यात काही कारण नसताना जर एखाद्याने रोजा सोडलाच तर जीवनात त्याने नंतर कितीही रोजे केले तरीही त्याच्यात बदल होणार नाही.( हुजूर अकरम सल-लल्लाहो अल्लेह वसल्लम का इरशाद है की जो शख्श बगर किसी वजह के एक दिन भी रमजान का रोजा छोड दे तो रमजान के इलावा वे पुरी जिंदगी भी रोजी रखे तो उसका बदल नही हो सकता!) *रोजा म्हणजे काय?* बारा वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या मुस्लिमाचे ‘रोजा’ हे कर्तव्य आहे. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत रोजा कायम असतो. रोजा केवळ पोटासाठीच ठेवण्यात येत नसून डोळे, कान ,तोंड, हात आणि पाय यासाठी असतो. डोळ्यासाठी रोजा म्हणजे वाईट गोष्टी न पाहणे, कानाचा रोजा म्हणजे वाईट गोष्टी न ऐकणे ,तोंडाचा रोजा म्हणजेच वाईट गोष्टीं नबोलणे ,हाताचा रोजा म्हणजे वाईट कामे न करणे ,तर पायाचा रोजा म्हणजे व्हाईट कार्याकडे न वळणे, याचाच अर्थ सर्व दृष्टप्रवृत्तींना आपल्यापासून दूर ठेवून स्वतःला ‘अल्हाच्या’ स्वाधीन करणे होय. एका वर्षात महिनाभर रोजा चालतो. इस्लामी दिनदर्शिकेनुसार हा नववा असतो. रमजानचा महिना प्रत्येक मुस्लिमांसाठी वाईट मार्गापासून स्वतःला दूर ठेवण्याचे आणि चांगल्या गोष्टीकडे वळण्यासाठी प्रशिक्षणाचा असतो, असेही म्हटल्यास गैर ठरणार नाही. रोजा ठेवण्यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे,असेही मानण्यात येते मानवाच्या पचनशक्ती वर परिणामकारक ठरणाऱ्या उपासामुळे आरोग्यास उपकारक असेही रमजान महिन्याचे वर्णन करता येईल. *ईद म्हणजे आनंद* आनंद व्यक्त करणे असा साधा सरळ अर्थ आहे. महिनाभर अल्हाच्या सेवेत राहिल्यानंतर बक्षीसाचा दिवस म्हणूनही ईदकडे बघितले जाते. प्रत्येक मुस्लिम बांधव या दिवशी आपल्या परीने मोठ्या pप्रमाणात हा सण साजरा करतो. याच दिवशी सर्वजण आपल्यातील धार्मिक दुरावा दूर करून सारून एकतेच्या भावनेने एकमेकांना शुभेच्छा देतात .

CLICK TO SHARE