जंगलात सरपण आणायला गेलेल्या इसमावर वाघाचा हल्ला: हल्यात इसम ठार

अन्य

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : शहरात लगत असलेल्या बामणी बेघर येथील इसम जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेला असता वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आली . माहितीनुसार बामणी बेघर येथील रहिवासी दिवाकर मनोहर उमाटे (५६) धंदा मजुरी हे १३ एप्रिल रोजी सकाळी केम तुकुम येथील जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेले होते रात्र होवूनही ते घरी परत न आल्यामुळे दुसरा दिवशी १४ एप्रिल ला त्याचे कुटुंबीयांनी नियतवनरक्षक केम यांना सायंकाळी ६.३० वाजता या बाबत माहिती दिली.महिती प्राप्त होताच वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्लारशाह हे अधिनस्त वनकर्मचारी समवेत वनात रात्री शोधमोहीम सुरू केली.वनात दिवाकर मनोहर उमाटे यांचा शोध घेत असतांना बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र केम मधील संरक्षीत वनखंड क्रमांक ५७७ मध्ये त्यांचे शव आढळुन आले. मोक्यावर पाहणी केली असता वाघाचे हल्यात दिवाकर मनोहर उमाटे यांचा मृत्यु झाल्याचे दिसुन आले. त्याक्षणी मृत व्यक्तीचे शव ताब्यात घेवुन पोलीस विभागाचे कर्मचारी व मृत व्यक्तीचे नातेवाईक यांचे समक्ष मौका पंचनामा नोंदवुन शव शवविच्छेदना करीता पोलीस विभागाचे ताब्यात देण्यात आले. व मृत व्यक्तीचे कुटुंबियांना सानुग्रह मदत देण्यात आलेली आहे.सदर प्रकरणाचा पुढील तपास मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर चे उपवनसंरक्षक, स्वेता बोड्डु, सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह नरेश भोवरे हे करीत आहेत.सदर वाघाला जेरबंद करण्याकरीता दोन चमु तयार करण्यात आले असुन वाघाचे वावर क्षेत्रात १५ ट्रॅप कॅमेरे व ४ लाईव्ह कॅमेरा लावुन वाघाला जेरबंद करण्याची कार्यवाही सुरु आहे. बल्हारशाह- बामणी लगत जंगल परिसरात वाघाचा वावर असल्यामुळे नागरीकांनी वनात प्रवेश करु नये, असे आवाहन वनविभागा मार्फत करण्यात येत आहे.

CLICK TO SHARE