शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर :- महाविकास आघाडी सोबत वंचित बहुजन आघाडीची युती होणार असल्याची शक्यता असतांना जागा वाटपावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी ‘एकला चलो रे’ भूमिका घेत आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले. एड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची दिनांक 11 एप्रिल रोजी सकाळी 9-30 वाजता गडचांदूर येथील शेख रहूफ शेख चमन शाळा मैदान, दुपारी 11-30 वाजता वणी येथील क्रीडा संकुल ग्राउंड येथे त्यानंतर संध्याकाळी 6-30 वाजता न्यू इंग्लिश शाळेच्या दर्गा मैदान चंद्रपूर येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील वंचित, शोषित, संविधान मानणाऱ्या, फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या असंख्य नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन वंचितचे उमेदवार राजेश बेले तसेच वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राकरिता संजीवनी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांना उमेदवारी दिली आहे. बेले यांचा लोकसभा क्षेत्रात जोरदार प्रचार, सभा, मेळावे सुरू आहेत.