अल्ल्लीपुर परीसरात मोठया प्रमाणात गारपीट,शासनाने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी.शेतकऱ्यांची मागणी

अन्य

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

८ एप्रिल चे मध्य रात्री वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस व गारपिटाला सुरूवात झाली . या अवकाळी पावसाने व गारपीटामुळे मात्र शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.यात शेतकऱ्यांच्या शेतातील तीळ , कोहळी , टरबूज , डांगर , टमाटर , व अन्य काही पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असुन आज सकाळी संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन जिल्हाधिकारी यांना व्हॉट्स ॲप द्वारे व तहसीलदार साहेब हिंगणघाट यांना फोन कॉल द्वारे पंचनामा करून शेतकऱ्यांच्या मदतीकरीता शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस वर्धा जील्हा कार्याध्यक्ष सचीन पारसडे ,दिनेश गुळघाने , विकास गोठे व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

CLICK TO SHARE