मविआ चे अधिकृत उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांचे वसमत तालुक्यात जंगी स्वागत करण्यात आले.

चुनाव

प्रतिनिधी : अशोक इंगोले( हिंगोली)

हिंगोली: वसमत महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी वसमत तालुक्यातील सर्व सर्कलला भेटी देऊन सर्व जनतेच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. ढोल ताशाच्या गजरामध्ये फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये सर्व सर्कल मध्ये नागेश पाटील आष्टीकर यांचे मतदारांनी जंगी स्वागत केले. यामध्ये आसेगाव सर्कल, गिरगाव सर्कल,कुरुंदा सर्कल,कवठा सर्कल, वसमत, बाबुळगाव, ह्यातनगर, टेंभुर्णी,खांडेगाव, वाखारी,आरळ, या सर्व ठिकाणी भेट देऊन जनतेशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. जर मी उमेदवारीचा फॉर्म भरला असेल, सर्व तुम्ही उमेदवार आहात असे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी आपल्या भाषणातून सांगितले. येणारी निवडणूक अत्यंत महत्त्वाचे आहे. ही निवडणूक लोकशाही टिकवण्याचे आहे, बेरोजगारांना रोजगार देण्याचे आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची आहे, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याची आहे, म्हणून आपण सर्वांनी विचार करून मतदान करावे असे नागेश पाटील आष्टीकर यांनी सांगितले. वसमत तालुक्यातील प्रत्येक सर्कलमध्ये नागेश पाटील आष्टीकर यांना मोठ्या संख्येने मतदारांचा प्रतिसाद.. त्यांच्यासोबत माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई, डॉक्टर एम आर क्यातमवार, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मुनीर पटेल,अब्दुल हफिज अब्दुल रहमान, रतनमाला शिंदे, मोनिता जाधव,रेणुकाताई पतंगे, कन्हैया बाहेती, यांच्यासह शेकडो महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

CLICK TO SHARE