प्रकल्पग्रस्त जागेवर अतिक्रमण राज्यपालांच्या आदेशाची पायमल्ली

अन्य

थडीपवनी तहसील नरखेड जिल्हा नागपूर येथील घटना

प्रतिनिधी:विजय सोनुले नरखेड

नियमानुसार कारवाई झाली नाही तर उभे करणार जनआंदोलन (रोशन काळे )नरखेड तालुक्यातील थडीपवनी गाव राजकीय क्षेत्रात मागील सहा दशकापासून सक्रिय असून मोठमोठ्या पदाधिकाऱ्यांची जन्मभूमी असलेले गाव वर्धा नदीच्या तिरावर वसलेले आहे. थडीपवनी गावाने वर्धा नदीच्या महापुराचा प्रकोप १९६१साली,१९८१ साली व १९९१ साली भोगला असुन आणि १९९१ च्या झालेल्या महापुरामुळे या गावाचे पुनर्वसन झाले. १९९१ च्या महापुरामुळे उध्वस्त झालेल्या थडीपवनी गावाचे पुनर्वसन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ०६ ऑगस्ट १९९१ मा. राज्यपाल यांच्या आदेशाने शासन निर्णय पारित केला होता. जुन्या गावठानातील १०५ कुटुंब वगळता संपूर्ण गावाचे पुनर्वसन करण्यात आहे होते. ज्या नागरिकांचे घरे पुरामुळे क्षितिग्रस्त झाले तेच नागरिक सध्या पुनर्वसन गावामध्ये वास्तव्य करत आहे. बाकी सगळे नागरिक जुन्याच गावठानावर अतिक्रमण करून राहत आहे. ज्या कुटुंबाचे शासनाने पुनर्वसन केले त्या कुटुंबाच्या जुन्या भूखंडाचा ताबा घेऊन त्या ठिकाणी सामाजिक वनीकरण करण्यात यावे असे प्रयोजन शासन निर्णयामध्ये करण्यात आले होते. परंतु सद्याची परिस्थिती पाहली तर ज्या नागरिकांनी ताबा सोडला नाही असे व ज्या नागरिकांनी आपला ताबा सोडलेला भूखंडावर जुन्या गावठानावर जे नागरिक राहत ते अतिक्रमण करून त्या जागेची लाखो रुपये घेऊन तोंडी करारावर परस्पर विक्री करत आहे.आजपर्यंत शासन निर्णयानुसार ही जागा शासनाने ताब्यात न घेतल्या मुळे वरील प्रकार घडत आहे. (माझ्या गावाचे सन १९९१ मध्ये पुनर्वसन झाले परंतु ज्या कुटुंबाचे पुनर्वसन शासनाने केले त्यापैकी जवळपास ७० टक्के नागरिक जुन्याच भूखंडावर राहत आहे. मी स्वतः शासनाची झालेली चुकी लक्षात आणून दिली तरीसुद्धा त्यावर काहीच कारवाई संबंधित अधिकारी करायला तयार नाही. नियमनुसार कारवाई झाली नाही तर मोठे जण आंदोलन उभे करणार ) रोशन बाबाराव काळे नागरिक थडीपवनी पुनर्वसन (गावाचे पुनर्वसन झाल्यामुळे काही नागरिक जुन्याच भूखंडावर अद्यापही राहत असुन त्यांचे पुनर्वसन येथील घराच्या परिसरामध्ये वास्तव्य नसल्यामुळे झाले झुडूपे वाढली आहे त्यापासुन पुनर्वसन येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.)संदीप गायनेर नागरिक थडीपवनी पुनर्वसन (ज्या नागरिकांना शासनाने पुनर्वसन गावामध्ये बांधून दिलेल्या घरामध्ये नागरिक राहायला येत नसेल तर जुन्या गावठानातील आम्ही सोडलेला भूखंड आम्हाला परत द्यावा.)दिनेश ठाकरे नागरिक थडीपवनी पुनर्वसन

CLICK TO SHARE