तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर
स्थानिक प्राचीन श्रीराम मंदिरात आज १७ एप्रिलला रामनवमी निमीत्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते याठिकाणी दिवसभर गावातील रामभक्तांनी हजरी लावून प्रभु श्रीरामाचे दर्शन घेतले सायंकाळी ७ वाजता राम मंदिरातून भजनी मंडळींच्या उपस्थितीत विविध देखाव्यासह फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य शोभायात्रा काढण्यात आली हि शोभायात्रा मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत निघाली यावेळी शोभायात्रेत नृत्य , ढोल ताशा पथक , हनुमान , मर्यादा पुरुषोत्तम रामाची मूर्ती होती , वानरसेना आदी वेशभूषा करुन युवक युवती सहभागी झाले होते. ढोल पथकाने शोभायात्रेचे आवाज अजूनच बुलंद केला शोभायात्रेत सर्वात पुढे घोडा , त्यानंतर भजन दिंड्या होत्या . शोभायात्रेच्या स्वागता करीता संपूर्ण गाव भगवे करन्यात आले होते.रस्त्यात ठीक ठिकाणी सरबत , चाहाचा वाटप करण्यात आला होता भक्तांच्या जय श्रीराम जय जय श्रीराम या घोषणेने संपूर्ण मार्ग दुमदुमून गेले होते. या शोभायात्रेत गावातील रामभक्त मोठया प्रमाणात सहभागी झाले होते.