मैदानी खेळ हद्दपार होण्याच्या मार्गावर

खेल

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

ग्रामिण भागात मैदानी खेळ हद्दपार होण्याच्या मार्गावर असून पुर्वी अनेक खेळाडू एकत्र येऊन खेळले जात होते. यामध्ये क्रिकेट हॉलीबॉल, फूटबॉल, कबड्डी, खो-खो, लंगडी, उंच उडी, पकडा-पकडी, लगोरी, गोट्या, विटी दांडू अशा अनेक खेळांचा समावेश होता . परंतु पारंपारीक मैदानी खेळ सध्या विस्मरणात गेले आहेत. बाजारात दाखल झालेली चायनिज खेळणी, मोबाईल, संगणक गेमचे आक्रमण बालकांवर मोठ्या प्रमाणात झालेले असून पारंपारीक खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे मुलांचा बाह्य जीवनाशी संवाद कमी होत असून संभाषण कौशल्यही हरवत चालले आहे.

CLICK TO SHARE